विधान परिषदेत मंत्र्यांची पूर्णवेळ उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 12:27 AM2019-07-03T00:27:04+5:302019-07-03T07:30:23+5:30

या अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये एकूण २० विधेयके पारित करण्यात आली.

Full attendance of ministers in the Legislative Assembly | विधान परिषदेत मंत्र्यांची पूर्णवेळ उपस्थिती

विधान परिषदेत मंत्र्यांची पूर्णवेळ उपस्थिती

Next

मुंबई : मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज बंद पडण्याचे अनेक प्रसंग उद्भवतात. मात्र, यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत मंत्री उपस्थित नसल्याच्या कारणामुळे एकदाही सभागृह तहकूब लागले नाही. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाजाचा वेळ वाया गेल्याचा प्रसंग विधान परिषदेत उद्भवला नसल्याचे संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

२० विधेयके पारित
या अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये एकूण २० विधेयके पारित करण्यात आली. एकूण १२ बैठकांच्या माध्यमातून एकूण ६८ तास ७ मिनिटे सभागृहाचे कामकाज झाले. मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज तहकूब करण्याची वेळ या अधिवेशनात आली नाही. अन्य कारणांमुळे १२ तास १४ मिनिटांचा सभागृहाचा वेळ वाया गेला. दररोज सरासरी ५ तास ४० मिनिटे सभागृहाचे काम चालले.

९५ औचित्याचे मुद्दे
या अधिवेशनात एकूण ९५ औचित्याचे मुद्दे आले. त्यापैकी २९ मांडण्यात आले. ७७२ पैकी २०५ लक्षवेधी सूचना मान्य करण्यात आल्या. त्यापैकी ५८ ची सभागृहात चर्चा झाली. २५६ विशेष उल्लेखांपैकी १३८ सभागृहात मांडण्यात आले. आठपैकी दोन अल्पकालीन सूचनांवर सभागृहात चर्चा झाली.
विधानसभेची २० आणि परिषदेचे एक अशी एकूण २१ शासकीय विधेयके पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत संमत करण्यात आली. तर, अशासकीय विधेयकांच्या सात सूचनांपैकी चार स्वीकृत करण्यात आली तर दोन विचारार्थ आहेत. १६१ पैकी १२७ अशासकीय ठरावाच्या सूचना स्वीकृत करण्यात आल्या.

२८२५ तारांकित प्रश्न
या अधिवेशनात २८२५ तारांकित प्रश्न आले. त्यापैकी ९७२ प्रश्न स्वीकारण्यात आले. तर ३७ प्रश्नांची सभागृहात तोंडी उत्तरे देण्यात आली. नियम ९३ अन्वये आलेल्या १३१ पैकी ८१ सूचना आल्या. त्यावर सभागृहात १४ निवदने झाली तर १६ पटलावर ठेवण्यात आली.

Web Title: Full attendance of ministers in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.