Join us

आघाडीची सत्ता आल्यास संपूर्ण कर्जमाफी; राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीरनाम्यात आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 1:45 AM

भाजपा सरकारच्या काळात शेती आणि शेतकऱ्यांवर हलाखीची परिस्थिती आली आहे, अशी टीका करत केंद्रात लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.

मुंबई : भाजपा सरकारच्या काळात शेती आणि शेतकऱ्यांवर हलाखीची परिस्थिती आली आहे, अशी टीका करत केंद्रात लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह नवाब मलिक व हेमंत टकले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पक्षाचा जाहीरनामा सादर केला.जाहीरनाम्यातील आश्वासने- अतिरिक्त साठ्यातील साखरेची निर्यात. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रति किलो ५ रु. दराने वाहतूक व हाताळणीसाठी साहाय्य- २०१८-१९ च्या हंगामात ऊस गाळपावर प्रति क्विंटल ९ रुपयांची वाढीव मदत- शेती उत्पादनांंना जीएसटीतून सूट दिली जाईल- जीएसटीचा २८ टक्के स्लॅब फक्त सर्वसाधारण ऐशआरामाच्या वस्तूंपुरताच- तिहेरी तलाकसह पर्सनल लॉसंदर्भात एक सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न करणारमहागाई, वाढत्या किंमती, बेरोजगारीमध्ये झालेली प्रचंड वाढ, मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांची दुर्दशा झाली आहे.- दिलीप वळसे पाटील

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूक