महाराष्ट्रात पुरे पूर मान्सून : ५० टक्के अधिकच्या पावसाने ऑगस्ट भरतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 04:35 PM2020-08-25T16:35:16+5:302020-08-25T16:35:58+5:30

पावसाने कसर भरून काढली.

Full flood monsoon in Maharashtra: August fills with 50% more rainfall | महाराष्ट्रात पुरे पूर मान्सून : ५० टक्के अधिकच्या पावसाने ऑगस्ट भरतोय

महाराष्ट्रात पुरे पूर मान्सून : ५० टक्के अधिकच्या पावसाने ऑगस्ट भरतोय

googlenewsNext
ठळक मुद्देतुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे तलाव भरले

 

सचिन लुंगसे

मुंबई : जून आणि जुलै महिन्यात आखडता हात घेतलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात आपली कसर भरून काढली आहे.  १ ते २४ ऑगस्ट या काळात महाराष्ट्रात ५० टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्रात या काळात सर्वसाधारणरित्या २३१.५ मिमी पावसाची नोंद होते. यावेळी पावसाने आपला मारा कायम ठेवल्याने ही नोंद ३४७.१ मिमी एवढी झाली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै ते २४ ऑगस्टपर्यंत देशभरातील पावसाचा विचार केला तर केरळ आणि उत्तर पश्चिम भारतात आणखी पावसाची गरज आहे. येथे पुरेसा पाऊस पडलेला नाही. ऑगस्ट महिन्यात पावसाने ब-यापैकी खेळी केली असली असून, मध्य भारत आणि उत्तर भारतात चांगला पाऊस पडला आहे. संपुर्ण ऑगस्ट महिन्याचा विचार करता अपेक्षेप्रमाणे संपुर्ण ऑरतात मान्सूनने उत्तम प्रगती केली आहे.

...........................

ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत पडलेला पाऊस खालीलप्रमाणे टक्क्यांत.
 
विभागवार अधिक पाऊस (टक्क्यांत)
कोकण ९४
मध्य महाराष्ट्र ८६
मराठवाडा ९
विदर्भ ३
...........................

जिल्हानिहाय अधिक पाऊस (टक्क्यांत)

मुंबई शहर १४६, मुंबई उपनगर १३०, ठाणे ९४, पालघर ११७, रायगड ९६, रत्नागिरी ८७, सिंधुदुर्ग ९१, कोल्हापूर ११६, सांगली ९९, सातारा १०२, पुणे १५२, नाशिक ६४, नंदूरबार १०६, धुळे ७२, औरंगाबाद ७६, गोंदिया ६३, अहमदनगर ५०, जळगाव ३०, जालना ४२, नागपूर ३५, भंडारा ५३, गडचिरोली ३१

...........................

पावसाची तूट (टक्क्यांत)

सोलापूर १५, उस्मानाबाद १, बीड १३, बुलढाणा १, वाशिम १०, हिंगोली ४, नांदेड १३, परभणी २८, लातूर २०, अकोला ३६, अमरावती ३७, यवतमाळ ३२, वर्धा २०, चंद्रपूर २०

...........................

मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांपैकी तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे तलाव भरले आहेत. अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा हे तलाव भरणे शिल्लक आहे.

सात तलावांतील उपयुक्त पाण्याचा साठा (वर्षनिहाय टक्केवारी)
२०२० : ९४.५६
२०१९ : ९६.१४
२०१८ : ९३.९७
 

Web Title: Full flood monsoon in Maharashtra: August fills with 50% more rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.