मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अंधेरी पश्चिममधील वेसावे कोळी वाड्यातील बँड पथकांना गेल्या दीड वर्षांपासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लग्न समारंभ बंद असल्याने मुंबई परिसरातील बँड पथकांची आर्थिक ओढाताण होत आहे. या पथकांना शासनाने अर्थसाहाय्य करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी केली आहे. वेसाव गावातील १६ बँड पथकांच्या प्रतिनिधींनी आपली भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. लॉकडाऊन काळात राज्य सरकारकडून मदत न मिळाल्याची खंत या प्रतिनिधींनी व्यक्त केली. विवाह समारंभासाठी कार्यालयांमध्ये कधी ५०, तर कधी १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. मात्र, बँड वाजविण्यास मनाई केली गेली. गेली दीड वर्षे व्यवसाय बंद असल्याने मुंबईतील २७५ बँड पथकांचे कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत, असेही दिव्या ढोले यांनी पत्रकात म्हटले आहे.
-----------------------–--------–--------------------