हँकॉक पूल पुनर्बांधणीला आणखी विलंब; गेली ९३ वर्षे हा पूल मुंबईकरांच्या सेवेत होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 01:54 AM2021-01-28T01:54:17+5:302021-01-28T01:54:32+5:30

या पुलाच्या ठिकाणी एक मोठा गर्डर टाकण्यात आला आहे, तर आणखीन एक गर्डर टाकणे आणि अन्य कामे अद्याप शिल्लक आहेत.

Further delay in Hancock bridge reconstruction; This bridge has been in the service of Mumbaikars for the last 93 years | हँकॉक पूल पुनर्बांधणीला आणखी विलंब; गेली ९३ वर्षे हा पूल मुंबईकरांच्या सेवेत होता

हँकॉक पूल पुनर्बांधणीला आणखी विलंब; गेली ९३ वर्षे हा पूल मुंबईकरांच्या सेवेत होता

Next

मुंबई :  माझगाव येथील ब्रिटिशकालीन हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला आणखी काही महिने विलंब होण्याची शक्यता आहे. या कामासाठी नेमलेल्या मे.राइट्स या समन्वयकाच्या कामात वाढ झाल्याने त्याला आणखी एक कोटी ३७ लाख ५२ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी नेमलेल्या समन्वयकासाठी महापालिका तब्बल तीन कोटी १७ लाख ५२ हजार रुपये मोजणार आहे.

हँकॉक पूल १४१ वर्षे जुना आहे. त्यावरील सततच्या रहदारीमुळे हा पूल धोकादायक झाला होता. त्यामुळे जानेवारी २०१६मध्ये मध्य रेल्वेने हा पूल पाडला. त्या जागी पर्यायी नवीन पूल उभारण्याबाबत योग्य नियोजन न झाल्याने या पुलाचे काम रखडले. या पुलाच्या बांधकामासाठी नियुक्त केलेला ठेकेदार रस्ते घोटाळ्याच्या काळ्या यादीतील असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर पालिकेने फेब्रुवारी २०१८मध्ये निविदा मागवून १९ महिन्यांत काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स (मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड केली. या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. या पुलाचे काम १५ महिन्यांनी वाढवल्याने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या पुलाच्या ठिकाणी एक मोठा गर्डर टाकण्यात आला आहे, तर आणखीन एक गर्डर टाकणे आणि अन्य कामे अद्याप शिल्लक आहेत. त्यामुळे या कामाला आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पुलाचे बांधकाम करताना पुलाखालून जाणाऱ्या ओव्हरहेड वायरचे स्थलांतरण करण्यासाठी रेल्वेला सुमारे ३९ कोटी तीन लाख रुपये पालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत.

ब्रिटिशकाळातील पूल
माझगाव-सँडहर्स्ट रोडदरम्यान रेल्वेवरील हा महत्त्वाचा पूल १८७९मध्ये ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता. १९२३मध्ये म्हणजेच ४४ वर्षांनंतर या पुलाचे नव्याने काम करण्यात आले. गेली ९३ वर्षे हा पूल मुंबईकरांच्या सेवेत होता. रहदारी वाढल्यामुळे वयोमानानुसार धोकादायक झालेला हा पूल जानेवारी २०१६ मध्ये पाडण्यात आला.

Web Title: Further delay in Hancock bridge reconstruction; This bridge has been in the service of Mumbaikars for the last 93 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई