Join us  

कॅम्पा कोलावासीयांचे भवितव्य ‘अंधारात’

By admin | Published: June 24, 2014 1:11 AM

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर शरणागती पत्कारणारे कॅम्पा कोलाचे रहिवासी आज अखेर प्रवेशद्वार उघडून पालिकेच्या कारवाईला सामोरे गेल़े

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर शरणागती पत्कारणारे कॅम्पा कोलाचे रहिवासी आज अखेर प्रवेशद्वार उघडून पालिकेच्या कारवाईला सामोरे गेल़े त्यामुळे गेले वर्षभर रहिवाशांच्या विरोधामुळे मेटाकुटीस आलेल्या अधिका:यांनी बेकायदा फ्लॅट्सचे वीज, पाणी आणि गॅस कनेक्शन कापून सुटकेचा नि:श्वास सोडला़ त्याचवेळी रहिवाशांच्या डोळ्यांमध्ये हताश भाव तरळत होत़े
रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्यानंतर रहिवाशांनी नमते घेतले होत़े त्यानुसार आज सकाळी 11 वाजता कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकासाठी कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी प्रवेशद्वार उघडल़े त्यामुळे कारवाईला वेग देत बेकायदा फ्लॅट्सचे वीज, पाणी आणि गॅस कनेक्शन तोडण्यास पालिका अधिका:यांनी सुरुवात केली़ रहिवासीदेखील सहकार्य करीत असल्याने पालिकेला पोलीस बळाचा वापर करावा लागला नाही़ 
दुपारी 11़3क् पासून संध्या़ 5़3क् र्पयत शांततेत कारवाई झाली़ बेस्ट व महानगर गॅस कंपनीच्या कर्मचा:यांनी संध्याकाळर्पयत 55 वीजजोडण्या व 14 गॅस पाइपलाइनची कनेक्शन्स तोडली़ तसेच पाण्याचे कनेक्शनही तोडण्यात आल़े पहिल्या टप्प्यात गॅस, वीज, पाणी कनेक्शन तोडल्यानंतर कारवाईची पुढची दिशा ठरविण्यात येईल, असे जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांनी सांगितल़े (प्रतिनिधी)
 
बेकायदा 
मजल्यांची माहिती
कॅम्पा कोला कंपाउंडमध्ये सात इमारती असून, 35 मजले बेकायदा आहेत़ असे एकूण 9क् हजार चौ़फूट बांधकाम तोडण्यात येणार आह़े सात इमारतींमध्ये प्रत्येकी पाच मजले बांधण्याची परवानगी होती़ प्रत्यक्षात मिडटाऊन - 2क्, ऑर्चिड - 17, बाय अर्पाटमेंट्स-6, पटेल अपार्टमेंट्स
(दोन इमारती) प्रत्येकी सहा मजले, शुभ अपार्टमेंट -7, ईशा एकता अपार्टमेंट - 8 मजले बांधण्यात आले आहेत़ 
 
रहिवाशांच्या विरोधामुळे पालिका अधिकारी सलग तीन दिवस प्रवेशद्वाराबाहेर उभे राहून विनवणी करीत होत़े मात्र रहिवासी अखेर नरमल्यामुळे पालिकेची फौज आज तयारीनिशी कंपाउंडमध्ये दाखल झाली़ 
 
महानगर गॅस, बेस्ट व जल विभागातील कर्मचा:यांचा समावेश असलेली प्रत्येकी चार जणांची 12 पथके तयार करण्यात आली़ ही पथके प्रत्येक इमारतीमध्ये जाऊन कारवाई करीत होती़
 
कॅम्पा कोला अंधारात बुडाले
मुंबई : तीन दिवस कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी पालिका अधिका:यांना प्रवेशद्वारावरच थोपवले होत़े; तर गांधीगिरीचा पवित्र घेतलेले अधिकारी प्रवेशद्वार उघडण्याची विनंती करीत होते. मात्र रहिवाशांची लढाई आज संपली आणि कॅम्पा कोला अंधारात बुडाल़े तब्बल 35 बेकायदा मजल्यांच्या सात इमारतींवरील ही कारवाई वर्षभर चर्चेत होती़ ही लढाई सर्वोच्च न्यायालयार्पयत पोहोचल्याने संपूर्ण देशभर हा विषय गाजला़ सोशल मीडियाच्या माध्यमातून सहानुभूती मिळवणो तसेच राजकीय नेत्यांकडून दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न रहिवाशांनी केला़ सर्वोच्च न्यायालयाने कारवाईस हिरवा कंदील दिल्यानंतरही रहिवाशांचा विरोध सुरूच राहिला़ मात्र अवमान याचिका दाखल करण्याच्या पालिकेच्या इशा:यानंतर रहिवाशांचा विरोध मावळला़ 
 
शुभ अपार्टमेंटपासून सुरुवात
कॅम्पा कोला कंपाउंडमध्ये सात इमारतींमधील मजले बेकायदा आहेत़ रहिवाशांनी द्वार उघडताच पालिकेने शुभ अपार्टमेंटपासून कारवाईस सुरुवात केली़ या इमारतींना पालिकेमार्फत पाणीपुरवठा होत नाही़ त्यामुळे येथे टँकरद्वारे पाणी वरच्या मजल्यांसाठी चढविले जात़े हेच कनेक्शन आज बंद करण्यात आल़े त्यानंतर ईशा-एकता, बी़ वाय़ आणि पटेल अपार्टमेंटमधील वीजपुरवठा बंद केला़
घराची किल्ली देण्यास नकार 
गेली वर्षभर पालिकेच्या कारवाईला विरोध करणा:या रहिवाशांनी आज माघार घेतली मात्र आपल्या घरांच्या किल्ल्या देण्यास अनेकांनी नकार दिला आह़े मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमध्ये काय ठरले, याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नसले तरी काही रहिवाशांनी आशा सोडलेली नाही़
कारवाई सुरूच राहणार
कॅम्पा कोलामधील 9क् बेकायदा फ्लॅट्सची कनेक्शन्स तोडण्यात येणार आहेत़ यापैकी आज दिवसभरात 55 फ्लॅट्सचे वीज कनेक्शन, 14 गॅस कनेक्शन आणि तीन फ्लॅट्सचे पाणी तोडण्यात आल़े उर्वरित फ्लॅट्सवर कारवाई सुरूच राहणार आह़े त्याप्रमाणो पालिकेचे पथक उद्या पुन्हा कॅम्पा कोलावर धडकणार आह़े