भविष्यातील उद्योजक घडविणार!

By Admin | Published: February 20, 2017 06:51 AM2017-02-20T06:51:10+5:302017-02-20T06:51:10+5:30

‘मेक इन इंडिया’ अभियानाला प्रोत्साहन देत आजच्या तरुणाईने कॉर्पोरेट सेक्टरची कास धरावी यासाठी ‘लोकमत’ आणि

Future entrepreneurs will be formed! | भविष्यातील उद्योजक घडविणार!

भविष्यातील उद्योजक घडविणार!

googlenewsNext

मुंबई : ‘मेक इन इंडिया’ अभियानाला प्रोत्साहन देत आजच्या तरुणाईने कॉर्पोरेट सेक्टरची कास धरावी यासाठी ‘लोकमत’ आणि ‘कोहिनूर बिझनेस स्कूल’ (केबीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्हिजन एमबीए २०१७’ ही कार्यशाळा रविवारी बोरीवलीत पार पडली. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थी वर्गाला शिक्षणाकडून कॉर्पोरेट क्षेत्राचा प्रवास उलगडण्यात आला. त्यात कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रवेश परीक्षा चढ-उतार, संघटनात्मक कार्य, यश-अपयश याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत याच क्षेत्रातील विद्वान मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एमबीएला जाण्यापासून ते एमबीए पूर्ण करेपर्यंत विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा, कोणत्या प्रवेश परीक्षा असतात, त्या परीक्षांची तयारी कशी करावी, अशा अनेक गोष्टींवर या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. ‘सीईटी’ची तयारी कशी करावी, गुणांची टक्केवारी कशी वाढवावी यावरही सखोल माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला शहर-उपनगरांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सीईटीसारख्या प्रवेश परीक्षांमध्ये अधिकाधिक गुण कसे मिळवता येतील यावर विवेक सारडा यांनी मार्गदर्शन केले. विष्णू चौरे यांनी एमबीएची दोन वर्षांची तयारी त्यानंतर या क्षेत्रामधील नोकरीच्या संधी आदी विषयांवर समुपदेशन केले. करिअर प्लानिंग, बी स्कूलची निवड, गुणवत्ता वाढविणे या विषयांवर संदीप सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Future entrepreneurs will be formed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.