Join us

मल्टिप्लेक्स थिएटर्सचे भवितव्य खडतर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 6:47 PM

Multiplex Theaters : ९३ टक्के प्रेक्षकांना सिनेमागृहांची उत्सुकता नाही   

मुंबई : पुनश्च हरिओम म्हणत राज्यातील व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स सुरू करण्यासाठी स्टॅण्डर्ड आँपरेटींग प्रोसिजर्स (एसओपी) तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही सिनेमागृहे सुरू झाली तरी पुढील दोन महिने तिथे जाण्याची फक्त सात टक्के प्रेक्षकांचीच तयारी आहे. लाँकडाऊनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जागा ओटीटी प्लँटफाँर्सनी व्यापली आहे. त्यामुळे भविष्यात मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर्सचे भवितव्य खडतर असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतली सिनेमागृहे सुरू करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रासह तेलंगाणा, तामिळनाडू, केरळ, छत्तीसगड आदी राज्यांनी मात्र सिनेमागृहांचे दार अद्याप उघडलेले नाही. जिथे सिनेमागृह सुरू झाली तिथे प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर लोकल सर्कल या संस्थेने प्रेक्षकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. जुलै महिन्यांत केलेल्या सर्वेक्षणात ७२ टक्के लोकांनी सिनेमागृहे सुरू करू नये असे मत मांडले होते. आँगस्ट महिन्यांत ते प्रमाण ७७ टक्के होते. आक्टोबर महिन्यांत ७४ टक्के लोक त्याच मानसिकतेत असल्याचे हा अहवाल सांगतो.

 मल्टिप्लेक्स थिएटर्स सुरू केली तर पुढील ६० दिवसांत काय कराल ?

-    सिनेमागृहांमध्ये जाणार नाही – ७४ टक्के

-    नवा सिनेमा आला तरच जाऊ – ४ टक्के

-    नवा जुना कोणताही सिनेमा बघू – ३ टक्के  

-    नक्की सांगता येत नाही – २ टक्के

-    थिएटरमध्ये सिनेमा बघतच नाही – १७ टक्के 

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉकमुंबईमहाराष्ट्र