शाश्वत विकासासाठी भविष्याचा वेध घेऊन धोरणे ठरवली पाहिजेत: देवेंद्र फडणवीस
By स्नेहा मोरे | Published: January 25, 2024 08:34 PM2024-01-25T20:34:20+5:302024-01-25T20:34:50+5:30
शाश्वत विकासासाठी आपल्याला भविष्याचा वेध घेऊन विकास धोरणे ठरवली पाहिजेत. सध्या जग हे जागतिक हवामान बदलाच्या प्रश्नाला सामारे जात आहे.
मुंबई - शाश्वत विकासासाठी आपल्याला भविष्याचा वेध घेऊन विकास धोरणे ठरवली पाहिजेत. सध्या जग हे जागतिक हवामान बदलाच्या प्रश्नाला सामारे जात आहे. आपल्या देशातील बदलते हवामान बदलाचे आव्हान लक्षात घेऊन शेती आणि उद्योगांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान येणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपाययोजना सुचविणाऱ्या स्टार्ट अपकरिता शासन सहकार्य करून सुचवलेल्या उद्योगांमध्ये राज्य शासन गुंतवणूक करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबई स्टॉक एक्सचेंज येथे 'मुंबई फेस्टिवल २०२४' अंतर्गत मुंबई फेस्टिवल रिंगिग बेल सोहळा आणि 'टर्बो स्टार्ट' चर्चासत्र उदघाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री गिरीश महाजन, उपमुख्यमंत्र्याचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,पर्यटन सचिव जयश्री भोज,मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा, मुंबई स्टॉक एक्सचेंजचे अधिकारी सुभाष केळकर, मुख्य सनिंयत्रण अधिकारी के. कमला, विझ क्राफ्ट संस्थेचे संस्थापक सबा जोसेफ यांची उपस्थिती होती. या टर्बो स्टार्ट' चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील.
या चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना सुचवणारा स्टार्ट अप जर एखादा उद्योग करण्यासाठी पुढे आल्यास शासन सहकार्य करेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात ४० टक्के 'स्टार्ट अप' काम करत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. राज्यात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी 'स्टार्ट अप' महत्वूपर्ण भूमिका बजावतील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
'मुंबई फेस्टिवल २०२४' अंतर्गत 'टर्बो स्टार्ट' अंतर्गत 'पृथ्वीच्या संवर्धनासाठी' या विषयावरील चर्चासत्रात स्वदेश फाऊंडेशनचे अध्यक्ष रोनी स्क्रूवाला, ड्रीम अकराचे संस्थापक हर्ष जय, इन मोबी ग्लोबल बेसचे संचालक विकास अग्निहोत्री, टर्बो स्टार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट राजू यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. वेळी मान्यवरांच्या हस्ते अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आठ वर्षे कार्यरत असलेले अंकित भाटेजा आणि राघव शर्मा, कचरा व्यवस्थापनात कार्यरत असलेले कबाडीवाला, आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या लिव्हप्रोटेक कंपनीच्या कामाबद्दल डॉ.राजा विजयकुमार आणि आलोक शर्मा यांचा सन्मान करण्यात आला.