भविष्याची तजवीज वर्तमानात कामी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 06:19 PM2020-04-29T18:19:13+5:302020-04-29T18:20:00+5:30

भविष्य निर्वाह निधितून काढले ४,६८५ कोटी; ७ लाख ४० हजार कर्मचा-यांना आर्थिक आधार

The future proposal works in the present | भविष्याची तजवीज वर्तमानात कामी

भविष्याची तजवीज वर्तमानात कामी

Next

 

मुंबई  : कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतील काही रक्कम काढण्याची मुभा केंद्र सरकारने नोंदणीकृत कर्मचा-यांना दिली आहे. त्या पैशांसाठी २८ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत तब्बल ७ लाख ४० हजार कर्मचा-यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यांना आपल्या पीएफ खात्यातील ४ हजार ६८५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.  

भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या कर्मचा-यांना आपले तीन महिन्यांचे मुळ वेतन आणि महागाई भत्याच्या एकत्रित रकमेच्या ७५ टक्के रक्कम म्हणजे जवळपास दीड महिन्यांच्या वेतना एवढी रक्कम खात्यातून काढण्याची मुभा देणारा आदेश केंद्रिय कामगार मंत्रालयाने लाँकडाऊनच्या घोषणनेनंतर जारी केला होता. हे अर्ज करण्यासाठी कर्मचा-यांना पीएफ कार्यालयात येणे शक्य नसल्याने आँनलाईन अर्ज करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यातील आधार कार्ड, जन्म तारीख अशा काही तांत्रिक त्रृटी दूर करण्यासाठी सवलत देण्यात आली होती. त्यानंतर हे पैसे मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही रक्कम कर्मचा-यांच्या पीएफ खात्यामध्ये जमा झालेल्या निधितूनच दिली जात असली तरी कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटात ती मोलाची ठरत आहे.

लाँकडाऊनच्या काळात ईपीएओने एकूण १२ लाख ९१ हजार दाव्यांचा निपटारा केला आहे. त्यापैकी ७ लाख २४ हजार दावे हे कोरोनाच्या काळातील आर्थिक सहकार्यासाठी जाहीर केलेल्या योजनेतून देण्यात आले आहेत. त्याची एकूण रक्कम ४ हजार ६८४ कोटी ५२ लाख इतकी आहे. त्यापैकी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) पँकेजच्या अंतर्गत दिली देलेली रक्कम २ हजार ३६७ कोटी इतकी आहे. लाँकडाऊनच्या काळात एक तृतियांश कर्मचारी कार्यरत असतानाही हे काम प्रभावी पद्धतीने केले जात असल्याची माहिती या विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

-----

पीएफ ट्रस्टचाही पुढाकार  

या काळात पीएफ ट्रस्टसुध्दा कर्मचा-यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून ७९,७४३ सदस्यांना ८७५ कोटी रुपये अँडव्हास रक्कम देण्यात आली आहे. त्यापैकी २२२ ट्रस्ट खासगी असून त्यांची रक्कम ३३८ कोटी आहे. तर, ७६ सार्वजनिक क्षेत्रातील अस्थापनांनी ५२४ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. त्याशिवाय २३ सहकारी संस्थांनी १२ कोटी ५४ लाख रुपये आपल्या ९२४ कर्मचा-यांना दिले आहेत. त्यात प्रामुख्याने टिसीएस, एचसीएल, एचडीएफसी बँकेचा समावेश आहे.    

 

Web Title: The future proposal works in the present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.