‘जी-२० परिषद; मुंबईत वाहतुकीच्या मार्गांत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 08:13 AM2022-12-13T08:13:12+5:302022-12-13T08:13:29+5:30

रहदारी सुरळीत राहण्यासाठी आणि वाहन चालकाची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये  बदल

G-20 Conference; Changes in transport routes in Mumbai | ‘जी-२० परिषद; मुंबईत वाहतुकीच्या मार्गांत बदल

‘जी-२० परिषद; मुंबईत वाहतुकीच्या मार्गांत बदल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबईमध्ये आयोजित जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर  १६ डिसेंबरपर्यंत वाहतूक रहदारी सुरळीत राहण्यासाठी आणि वाहन चालकाची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये  बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी दिली आहे.  

मार्ग बंद आणि वाहने उभी करण्यास मनाई  
१) नेहरू रोडकडून हॉटेल ॲण्ड हयातकडे जाणारा रस्ता (वाकोला पाइपलाइन रोड) सर्व वाहनांकरिता (आपत्कालीन सेवा वाहने वगळून)
 २) हॉटेल ॲण्ड हयातकडून जुना सीएसएमटीकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांकरिता. 
३) पटुक महाविद्यालय जंक्शनकडून हॉटेल ॲण्ड हयातकडे जाणारा रस्ता (छत्रपती शिवाजीनगर रोड) सर्व वाहनांकरिता. 

पर्यायी मार्ग
 नेहरू रोडवरून हनुमान मंदिरापासून उजवीकडे जाणारी वाहने उजवे वळण न घेता सरळ मिलिट्री कॅम्प जंक्शनवरून उजवे वळण घेऊन कलिना जंक्शनमार्गे आंबेडकर जंक्शन किंवा हंस भुग्रा रोडवर मार्गस्थ होतील. 
 जुन्या सीएसएमटी रोडवरून हॉटेल ॲण्ड हयातकडे येणाऱ्या वाहनांनी उजवे वळण न घेता सरळ हंस भुग्रा जंक्शनवरून डावे वळण घेऊन वाकोला जंक्शनमार्गे नेहरू रोड, सांताक्रूझ स्टेशन किंवा पश्चिम द्रुतगती महामार्गाने पुढे मार्गस्थ होतील.
 नेहरू रोडवरून पटुक जंक्शनवरून उजवीकडे जाणारी वाहने उजवे वळण न घेता सरळ मिलिट्री कॅम्प जंक्शनवरून उजवे वळण घेऊन कलिना जंक्शनमार्ग आंबेडकर जंक्शन किंवा हंस भुग्रा रोडवर मार्गस्थ होतील.

Web Title: G-20 Conference; Changes in transport routes in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.