गणाचार्य श्रमिकांच्या उत्कर्षासाठी लढले-भाई वैद्य

By admin | Published: May 23, 2017 02:17 AM2017-05-23T02:17:57+5:302017-05-23T02:17:57+5:30

कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य हे श्रमिकांच्या उत्कर्षासाठी लढले. त्यांनी आपले आयुष्य संघर्षात घालवले म्हणूनच आज किमान आपण कामगारांच्या हक्काबाबत बोलत आहोत

Gaanyacharya fought for the welfare of labor-brother Vaidya | गणाचार्य श्रमिकांच्या उत्कर्षासाठी लढले-भाई वैद्य

गणाचार्य श्रमिकांच्या उत्कर्षासाठी लढले-भाई वैद्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य हे श्रमिकांच्या उत्कर्षासाठी लढले. त्यांनी आपले आयुष्य संघर्षात घालवले म्हणूनच आज किमान आपण कामगारांच्या हक्काबाबत बोलत आहोत, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनी केले. कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वीर स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
वैद्य म्हणाले की, कामगार संघटना का संपल्या? चळवळी का क्षीण झाल्या? यांचा विचार होणे गरजेचे आहे. अर्थव्यवस्था समजावून घेताना ती श्रमिक वर्गालाही समजावून सांगण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी वैद्य यांनी गणाचार्य यांच्या कार्यासह आठवणींनाही उजाळा
दिला.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले की, गांधीवाद आणि मार्क्सवाद यांच्यासाठी गुलाबराव ठामपणे उभे राहिले.
कामगार आणि शेतकरीविरोधी धोरणे राबवणाऱ्यांना सत्तेवर आणण्यामध्ये शेतकरी व कामगारांची मोठी भूमिका आहे. सध्यातरी शेतकरी आणि कामगार वर्गाने गुलाबरावांचा आदर्श घेऊन विचारांचे
आचरण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
खासदार हुसैन दलवाई या वेळी म्हणाले की, संघटित उद्योगांतील कामगारदेखील आता असंघटित होऊ लागले आहेत. गुलाबरावांच्या काळात कामगार हिताचे निर्णय घेतले जात असत. मात्र, आता कामगार
नेत्यांचे करार पंचतारांकित हॉटेलमध्ये होतात आणि त्यामध्ये कामगार हिताऐवजी स्वत:च्या हितांना महत्त्व दिलेले असते. गिरणी कामगार संपुष्टात येईल, असे कधीच वाटले नव्हते मात्र ही परिस्थिती प्रत्यक्षात आली आहे.

Web Title: Gaanyacharya fought for the welfare of labor-brother Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.