‘गदग-पुद्दुचेरी’ एक्स्प्रेसचा अपघात सिग्नल ताेडल्याने?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 06:34 AM2022-04-19T06:34:57+5:302022-04-19T06:36:10+5:30
माटुंगा रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्री गदग एक्स्प्रेस आणि पुद्दुचेरी एक्स्प्रेस या दोन गाड्यांची टक्कर झाली होती.
मुंबई: मध्य रेल्वेवरील लांब पल्ला आणि उपनगरीय सेवेचे वेळापत्रक पार कोलमडून टाकणाऱ्या शुक्रवारी रात्रीच्या अपघाताला सिग्नल तोडणे कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला मुख्य नियंत्रकांनी १६ एप्रिल रोजी दिलेला एक अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने काहीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली.
माटुंगा रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्री गदग एक्स्प्रेस आणि पुद्दुचेरी एक्स्प्रेस या दोन गाड्यांची टक्कर झाली होती. लोको पायलट आणि सहायक लोको पायलट यांना एस-१५ क्रमांकाचा सिग्नल लाल आहे हे लक्षात आले नाही. त्यामुळेच इंजिन आणि ११००५ या गाडीचे डबे एकमेकांवर घासले गेले, असे मुख्य नियंत्रकाच्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश यापूर्वीच दिले आहेत.