अलिबागच्या छायाचित्रकाराची गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:31 AM2018-03-17T02:31:22+5:302018-03-17T02:31:22+5:30

जगात सर्वांत मोठी फोटोग्राफी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या ‘२०१८ सोनी वर्ल्ड फोटोग्राफी’ स्पर्धेत ‘टॉप फाइव्ह’मध्ये अलिबागचा वाइल्डलाइफ फोटोग्राफर स्वप्निल देशपांडे याचा समावेश करण्यात आला आहे.

Gaganbhari of Alibaug photographer | अलिबागच्या छायाचित्रकाराची गगनभरारी

अलिबागच्या छायाचित्रकाराची गगनभरारी

Next

मुंबई : जगात सर्वांत मोठी फोटोग्राफी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या ‘२०१८ सोनी वर्ल्ड फोटोग्राफी’ स्पर्धेत ‘टॉप फाइव्ह’मध्ये अलिबागचा वाइल्डलाइफ फोटोग्राफर स्वप्निल देशपांडे याचा समावेश करण्यात आला आहे.
व्यवसायाने अभियंता असलेल्या स्वप्निलला प्रवासाची आवड आहे. स्वप्निलने कान्हाच्या जंगलात भक्षकापासून पळणारे काळवीट अतिशय सफाईदार आणि अचूकपणे टिपले. स्वप्निलचे शालेय जीवन अलिबाग येथे झाले.
त्यानंतर चेंबूर येथील विवेकानंद महाविद्यालयात त्याने पुढील शिक्षण घेतले. या सर्व मार्गक्रमणात त्याने छायाचित्रणाचा छंद मनापासून जोपासला. इंटरनेटच्या माध्यमातून फोटो काढण्याच्या नवनवीन पद्धती तो शिकत गेला. गेल्या ६ वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यानंतर या स्पर्धेतील टॉप फाइव्हमध्ये स्वप्निलने स्थान पटकावले आहे. सोनी
वर्ल्ड फोटोग्राफी अ‍ॅवॉर्ड्ससाठी
२००हून अधिक देशांमधील तब्बल ३ लाख २० हजार प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.
>यशासाठी संयम गरजेचा
आपल्याला जे काही करायचे असेल ते मन लावून करा. यश मिळवण्यासाठी संयम बाळगणे गरजेचे आहे.
- स्वप्निल देशपांडे, छायाचित्रकार

Web Title: Gaganbhari of Alibaug photographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.