Gajanan Kale: मोठी बातमी! अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी गजानन काळेंच्या पत्नी थेट राज ठाकरेंच्या दरबारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 10:34 AM2021-08-21T10:34:30+5:302021-08-21T10:35:10+5:30
Gajanan Kale: घरगुती हिंसाचार आणि जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणाऱ्या गजानन काळेंच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे.
Gajanan Kale: नवी मुंबईचेमनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यासमोर अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. घरगुती हिंसाचार आणि जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणाऱ्या गजानन काळेंच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. संजीवनी काळे त्यांच्या वडिलांसह आज सकाळी मुंबईत राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.
गजानन काळे यांच्याबाबत ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनी दिले आदेश
गजानन काळेंकडून सुरू असलेल्या अत्याचारा पाढा वाचण्यासाठी संजीवनी काळे यांनी थेट राज ठाकरेंना भेट घेण्याचा ठरवलं आणि त्यात कृष्णकुंजवर दाखल झाल्या आहेत. दरम्यान, राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असल्यानं ते घरी नाहीत. त्यामुळे संजीवनी काळे आणि त्यांचे वडील राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडणार आहेत. त्यामुळे आता गजानन काळे प्रकरणावर राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
गजानन काळे प्रकरणात मनसेकडून आली पहिल्यांदाच प्रतिक्रिया; शर्मिला ठाकरे म्हणाल्या...
काही दिवसांपूर्वी संजीवनी काळे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचीही भेट घेतली होती. संजवनी काळेंनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर गजानन काळे फरार आहेत. तसंच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केलेला आहे. गेल्या १० दिवसांपासून नवी मुंबई पोलीस गजानन काळे यांचा शोध घेत आहेत. गजानन काळे यांच्या विरोधात नवी मुंबईतील नेरुळ पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे पत्नी संजीवनी काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. गजानन काळेंवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेची मागणी; पोलीस आयुक्तालयाबाहेर माविआच्या महिला जमा
गजानन काळे यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर भाजपासह महाविकास आघाडीमधील महिला चांगल्याच आक्रमक पाहायला मिळत आहे. तक्रार दाखल करुन चार दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. याचपार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या महिलांनी गजानन काळेंच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन केले होते.