गजानन कीर्तिकर म्हणाले, ‘मी एकटा पडलो’; मतदानानंतर व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 10:37 AM2024-05-21T10:37:07+5:302024-05-21T10:37:57+5:30

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. पत्नीसह दोन्ही मुली आणि अमोल ...

Gajanan Kirtikar said, 'I fell alone'; Expressed regret after voting | गजानन कीर्तिकर म्हणाले, ‘मी एकटा पडलो’; मतदानानंतर व्यक्त केली खंत

गजानन कीर्तिकर म्हणाले, ‘मी एकटा पडलो’; मतदानानंतर व्यक्त केली खंत


मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. पत्नीसह दोन्ही मुली आणि अमोल कीर्तिकर यांचा या निर्णयाला विरोध होता; परंतु काही वेगळ्या कारणामुळे हा निर्णय घेतला. मात्र, एकनाथ शिंदेंसोबत गेलो आणि अजित पवारांसारखा एकटा पडलो, असे शिंदेसेनेचे नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. 

गजानन कीर्तिकर यांनी पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनातील खंत बोलून दाखवली. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान प्रक्रिया पार पडली. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात  उद्धवसेनेचे अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिंदेसेनेचे रवींद्र वायकर रिंगणात आहेत. गजानन कीर्तिकर यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध झाल्याने अखेरच्या क्षणी वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली.  

‘ईडीला घाबरून गेलो नाही‘
पत्नीबरोबरच दोन्ही मुली आणि अमोल यांचा माझ्या निर्णयाला प्रखर विरोध होता. ईडी, खोके किंवा कोणत्याही तपास यंत्रणांना घाबरून शिंदेंसोबत गेलो नाही. त्यामागे एक वेगळे कारण होते, असेही गजानन कीर्तिकर म्हणाले. 

‘ठाकरेंची साथ सोडणे आम्हाला आवडले नाही’
गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना म्हणाल्या, कीर्तिकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ नये, असे अनेकदा बजावले. आम्हाला ते आवडलेही नाही. वरिष्ठ नेते असताना एकनाथ शिंदे यांना सलाम ठोकणार का, असा सवाल आम्ही केला होता. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यानुसार, त्यांनी तो घेतला. मात्र, मी माझ्या मुलाच्या अमोल कीर्तिकर यांच्या पाठीमागे ठाम उभी आहे. तो मोठ्या मताधिक्याने निवडून येईल.
 

Web Title: Gajanan Kirtikar said, 'I fell alone'; Expressed regret after voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.