मविआला चांगल्या जागा मिळतील, गजानन कीर्तिकर यांचे खळबळजनक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:42 AM2024-05-22T10:42:39+5:302024-05-22T10:42:55+5:30
मी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते. पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो. आज टर्निंग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो, अशी खंत मतदानानंतर गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी व्यक्त केली होती.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जे उमेदवार दिलेले आहेत, त्यांनी चांगली लढत दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील, असा दावा शिंदेसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
मी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते. पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो. आज टर्निंग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो, अशी खंत मतदानानंतर गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी व्यक्त केली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे. ठाकरेंना सोडून अमोेल जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ना नगरसेवक, ना आमदार, थेट खासदार
अमोलला बोट धरून मी शिवसेनेत आणले, पण पक्षात जी संधी मिळायला हवी होती ती त्याला मिळाली नाही. आता त्याला संधी मिळाली आहे. अमोल ना नगरसेवक, ना आमदार तर डायरेक्ट खासदार होणार, असे वक्तव्यही गजानन कीर्तिकर यांनी केले.