Join us

जुगाराचा अड्डा चालविणारा सलीम खान आणि टोळी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:06 AM

मुंबई : ट्रॉम्बे परिसरात मटका जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या सलीम अहमद खान देशमुख आणि टोळीला बुुधवारी हद्दपार करण्यात आले ...

मुंबई : ट्रॉम्बे परिसरात मटका जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या सलीम अहमद खान देशमुख आणि टोळीला बुुधवारी हद्दपार करण्यात आले आहे. सलीम विरोधात २१ गुन्हे नोंद आहेत. परिमंडळ ६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

सलीम आणि त्याच्या टोळीतील सदस्य वैभव शंकर आल्हाट, प्रल्हाद नामदेव आल्हाट, राजू वावरे यांच्याविरुद्ध वेळोवेळी कारवाई करूनदेखील गुन्हेगारी कृत्य सुरूच आहे. अशात ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने त्यांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव परिमंडळ ६ कडे सादर केला. त्यानुसार, सलीमसह एकूण १८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. ते पुन्हा या भागात दिसल्यास त्यांच्याबाबत माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.