Join us  

गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ

By admin | Published: December 03, 2015 1:33 AM

महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, त्याचा गैरफायदा बोगस डॉक्टर घेवू लागले आहेत. गावठाण व झोपडपट्टी परिसरात तब्बल २७ बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे निदर्शनास

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, त्याचा गैरफायदा बोगस डॉक्टर घेवू लागले आहेत. गावठाण व झोपडपट्टी परिसरात तब्बल २७ बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे निदर्शनास आले असून, ९०४ खाजगी क्लिनिकमधील ३३४ डॉक्टरांकडे आवश्यक प्रमाणपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात गरीब रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, याकडे पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागही दुर्लक्ष करत आहे. नेरूळ सेक्टर ६ सारसोळे गावामधील संजीवनी क्लिनिकचा मालक दत्तात्रय आगदे याची वैद्यकीय पदवी बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळे एक रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी आगदेला अटक केली असली तरी त्यामुळे ज्याचा जीव गेला व ज्यांच्यावर चुकीचे उपचार करण्यात आले त्यांच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. १५ वर्षे क्लिनिक चालविणारा हा बोगस डॉक्टर या परिसरात खूपच प्रसिद्ध होता. त्याच्याकडे रुग्णांची मोठी रांग लागलेली असायची. आतापर्यंत उपचार करून घेतलेले नागरिकही भयभीत झाले आहेत. या प्रकरणामुळे शहरातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका क्षेत्रात झोपडपट्टी व गावठाण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी दवाखाने उघडले आहेत. महापालिकेने शहरातील सर्व ९०४ क्लिनिक चालकांना पत्र पाठवून त्यांच्याकडील सर्व प्रमाणपत्रे तपासण्यासाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आतापर्यंत ५७० जणांनी पूर्ण कागदपत्रे सादर केली असून ते नियमाप्रमाणे व्यवसाय करत आहेत. ३३४ जणांची कागदपत्रे अपुरी आहेत. अद्याप त्यांनी पूर्ण कागदपत्रे सादर केलेली नाही. शहरातील २७ बोगस डॉक्टर असल्याचे निदर्शनास आले आहे. यामधील २६ जणांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. यामधील सात जणांनी मूळ ठिकाणावरून दवाखाने बंद केले आहेत. परंतु अनेकांनी दुसऱ्या विभागात दवाखाने टाकले आहेत. १९ बोगस डॉक्टर आहे त्याच ठिकाणी अद्याप व्यवसाय करत असून त्यांच्यावर कोणीच कारवाई करत नाही. शहरातील बोगस डॉक्टर नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. नेरूळमधील उत्तम आंधळे यांचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला. अशाप्रकारे अनेकांचे जीव गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगदेचे नावच नाहीनेरूळमधील संजीवनी क्लिनिकमधील बोगस डॉक्टर दत्तात्रय आगदे १५ वर्षे या परिसरात व्यवसाय करत होता. परंतु पालिकेच्या बोगस डॉक्टरांच्या यादीमध्ये त्याचे नावच नाही. अशाप्रकारे शहरात १०० पेक्षा जास्त बोगस डॉक्टर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगदेने त्याच्या पाटीवर बीएएमएस सीसीएच सीजीओ अशी डिग्री लिहिली होती. बोगस डॉक्टर अशाचप्रकारे उच्चशिक्षित असल्याचे भासवून गरीब रुग्णांना लुटले जात आहे. पोलिसांसह पालिकेचेही दुर्लक्ष महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. रमेश निकम असताना त्यांनी नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सर्व खाजगी रुग्णालयांची कागदपत्रे तपासली होती. बोगस डॉक्टरांवर कारवाई केली होती. परंतु ते या पदावरून बाजूला झाल्यापासून या कारवाईमध्ये सातत्य दिसत नाही. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची जबाबदारी फक्त महापालिकेची नाही. पोलीस प्रशासनाने व अन्न औषध प्रशासन विभागानेही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, परंतु या दोन्ही आस्थापना त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. नेरूळमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे अल्फांसो यांच्याप्रमाणे सर्वांनी दक्ष राहिल्यास गरीब रुग्णांच्या आरोग्याशी सुरू असणारा खेळ थांबेल. पालिकेने दिलेली बोगस डॉक्टरांची यादी डॉक्टरांचे नाव कार्यक्षेत्र दत्तात्रय विश्वनाथ देडेकरावे जावेद अख्तर रियाज अहमद खानतुर्भे स्टोअररामनरेश सोमारी शर्मातुर्भे स्टोअरएम. ए. शेखतुर्भे नाकाविद्या वाचस्पती शर्मातुर्भे स्टोअरमोहम्मद जहांगीर आलमतुर्भे सेक्टर २१बंटुराम रामकरण यादवतुर्भे स्टोअर रीयाजुद्दीन खानइंदिरानगरए.के. पांडे इंदिरानगरसिद्धीकी दिलशाहअहमद रियाजुद्दीनखैरणेआजाद रामपलटखैरणेसोनालिनी बॅनर्जीखैरणेसुनील कुमार सिंगमहापेदगडू साहेबराव ठाकरेमहापेसुरेंद्र बहादूर बबनसिंग सिंगमहापेकैलासचंद्र जनार्दन पांडेमहापेरामअवध विश्वनाथ यादवपावणेदेवशिश कुमारघणसोलीभारत यू. शर्माकातकरीपाडाराजेंद्र भिला पाटीलचिंचपाडा ऐरोलीविनोद सुदामराव बरडेचिंचपाडा ऐरोलीविश्वकर्मा राकेश रामअवधइलठाणपाडादिलबीर सिंग नेरूळकुरून एस. थॉमसवाशीबाळासाहेब बागलराबाडा