Join us  

गेमिंग डिसॉर्डर विद्यार्थ्याला 'सुधारसंधी'; न्यायालयाचा दिलासा, गुणसुधार परीक्षा हुकली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 7:14 AM

शैक्षणिकदृष्ट्या उत्तम असलेल्या मात्र, इंटरनेट गेमिंमध्ये अडकून गेमिंग डिसॉर्डर झालेल्या विद्यार्थ्यांची गुणसुधार परीक्षा हुकली होती

मुंबई : शैक्षणिकदृष्ट्या उत्तम असलेल्या मात्र, इंटरनेट गेमिंमध्ये अडकून गेमिंग डिसॉर्डर झालेल्या विद्यार्थ्यांची गुणसुधार परीक्षा हुकली होती. या परीक्षेस कॉलेजनेही त्याला बसण्यास नकार दिला होता. अखेर याप्रकरणी उच्च न्यायालायत धाव घेणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याला न्यायालयाने गुणसुधार संधी परीक्षेस बसण्याची संधी देत दिलासा दिला. गुण सुधार परीक्षेत बसण्याची संधी देण्यास तो विद्यार्थी पात्र आहे, असे न्या. ए. एस. चांदुकर व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

प्रथमपासून आपण सरासरी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक गुण मिळवत होतो. अकरावीत ८५ ते ९३ टक्क्यांदरम्यान गुण मिळाले. मात्र, जेव्हा बारावीच्या परीक्षेस बसलो, तेव्हा नैराश्य आणि गेमिंग डिसॉर्डने ग्रासले होते.

कागदपत्रे तपासल्यानंतर मुभा...

इंटरनेट गेमिंगने ग्रस्त असल्याबद्दल सुरू असलेल्या उपचारांची कागदपत्रेही याचिकाकर्त्याने याचिकेला जोडली होती, सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्याला गुण सुधार परीक्षेला बसण्याची संधी देण्यास पात्र आहे, असे म्हटले. 

टॅग्स :मुंबईपरीक्षाविद्यार्थी