Lalbaugcha Raja 2018: गणपती बाप्पा मोरया', लालबागच्या राजाचं मुखदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 09:09 PM2018-09-11T21:09:12+5:302018-09-11T23:02:24+5:30
Lalbaugcha Raja 2018: मुंबापुरीतील मानाच्या लालबागच्या राजाचं दर्शन आज भक्तांना घडलं आहे. मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात लालबागच्या राजाचं आगमन मंडपात झाल.
मुंबई - मुंबापुरीतील मानाच्या लालबागच्या राजाचं मुखदर्शन आज भक्तांना घडलं आहे. मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात लालबागच्या राजाचं मंडपात दर्शन घडले. यावेळी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव जवळ येत असल्याने गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे यावेळी दिसून आले. ढोल-ताशांचा गजर, विद्युत रोषणाई आणि गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भाविकांनी मुखदर्शन घेतले.
मुंबईच्या लालबाग परिसरातील गणेश गल्ली येथे लालबागच्या राजाचं आज सायंकाळी 8 वाजता मुखदर्शन घेण्यात आलं. यावेळी गणेशभक्तांनी सेल्फी आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने परिसर भक्तिमय झाला होता. यंदा लालबागच्या राजाने मोराच्या पिसांची प्रभावळ धारण केली आहे. तर राजाच्या स्टेजवरून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा देखावा उभारण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ -