मुंबई - गणेशोत्सवादरम्यान १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरपर्यंत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने काही मार्ग बंद ठेवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड (दक्षिण वाहिनी) - भारतमाता जंक्शन ते बावला कंपाउंडपर्यंत उद्या सकाळी ६ वाजल्यापासून २३ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतूकीस बंद करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरात जड वाहनांची वाहतूक बंद असल्याने पर्यायी मार्ग देण्यात आलेले नाहीत. तसेच या भारतमाता जंक्शन ते बावला कंपाउंडपर्यंतचा मार्ग उद्या सकाळी ६ वाजल्यापासून ते २३ सप्टेंबर रोजी दररोज दुपारी ३ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. जड वाहने सोडून इतर वाहनांसाठी भारतमाता जंक्शन येथून उजवीकडे वळण घेऊन करी रोड पूल, शिंगटे मास्तर चौकातून डावीकडे वळण घेऊन एन. एम जोशी मार्ग, आर्थर रोड नाका, एस ब्रिज मार्ग, डॉ. बी. ए. रोड आणि भारतमाता जंक्शनकडून डावीकडे वळण घेऊन नाईक चौक, साईबाबा पथ येथून डावीकडून वळून जी. डी. आंबेकर मार्ग, दिपक ज्योती टॉवर, श्रवण यशवंते चौक असे पर्यायी मार्ग खुले असणार आहेत. त्याचप्रमाणे डॉ. बी. ए. रोड (दक्षिण वाहिनी ) - डॉ. बी. ए. रॉड दक्षिण वाहिनीने गॅस कंपनी चौकातून साने गुरुजी मार्ग उजवीकडे जाणारी वाहतूक उद्यापासून सकाळी ६ वाजल्यापासून ते २३ सप्टेंबर रात्री १२ वजाईपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासाठी गुलाबराव गणाचार्य चौकात (आर्थररोड नाका ) जाण्यासाठी डॉ. बी. ए. रोड , भारतमाता जंक्शनकडून उजवीकडे वळून करी रोड रेल्वे पूल, शिंगटे मास्तर चौकातून डावे वळण एन. एम. जोशी मार्ग, गुलाबराव गणाचार्य चौक आणि या चौकात जाण्यासाठी डॉ. बी. ए. रोड गॅस कंपनी जंक्शन येथून सरळ जाऊन काळाचौकी जंक्शन, बावला कंपाउंड येथे यु टर्न घेऊन डॉ. बी. ए. रोड (उत्तर वाहिनी ) - गॅस कंपनी जंक्शनकडून डावे वळण घेऊन एन. एम, जोशी मार्ग, गुलाबराव गणाचार्य चौक असा पर्यायी मार्ग असेल तर चिंचपोकळी रेल्वे पुलावरून साने गुरुजी मार्गाने गॅस कंपनी जंक्शन येथे उजवीकडे जाणारी वाहतूक उद्यापासून सकाळी ६ ते २३ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गासाठी गुलाबराव गणाचार्य चौकातुन पुढे एन. एम. जोशी मार्गावरून पुढे येऊन एस ब्रिज मार्ग असा पर्यायी मार्ग असेल. त्याचप्रमाणे चिंचपोकळी रेल्वे पुलावरून साने गुरुजी मागाहून सरळ डॉ. बी. ए. रोड (उत्तर वाहिनी ) भारतमाता जंक्शनवरून उजवे वळण घेऊन जी. जी. भाई लेन, साईबाबा पथ, ग. द. आंबेकर मार्ग, श्रवण यशवंते चौक , अल्बर्ट जंक्शन, तानाजी मालुसरे मार्ग, टी. बी. कदम मार्ग, बावला कंपाउंड, डॉ. बी. ए. रोड हा मार्ग खुला असेल. तसेच चिंचपोकळी पुलावरून येणार साने गुरुजी मार्ग (उत्तर वाहिनी ) उद्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत २४ तास वाहतुकीसाठी बंद करण्यास येईल. यासाठी चिंचपोकळीहुन एन. एम. जोशी मार्गावरून पुढे येऊन एस ब्रिज मार्गे पर्यायी वाहतुकीसाठी रस्ता सुरु ठेवण्यात आला आहे. एस.एस. राव रोडवरील नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकी हा रस्ता उद्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत २४ तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल. मात्र, स्थानिकांची वाहने सोडण्यात येतील. दत्ताराम लाड मार्ग - डॉ. बी. ए. रोडवरील सरदार हॉटेल जंक्शन ते श्रवण यशवंते चौक (दोन्ही बाजूने ) उद्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत २४ तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवासी डॉ. बी. ए. रोडवरून श्रवण यशवंते चौकाकडे जाण्यासाठी डॉ. बी. ए. रोडने बावळा कंपाउंडकडू डावे वळण आणि टी. बी. कदम मार्गावरून उजवे वळण, तानाजी मालुसरे मार्गावरून डावे वळण घेऊन रामभाऊ भोगले मार्ग आणि श्रवण यशवंते चौकाकडे येऊ शकतात. श्रवण यशवंते चौकाकडून डॉ. बी. ए. रोडकडे येण्यासाठी अल्बर्ट सर्कल जंक्शनकडून उजवे वळण आणि तानाजी मालुसरे मार्गावरून डावे वळण घेऊन टी. बी. कदम मार्गाने डॉ. बी. ए. रोडकडे जाऊ शकतो.