मुंबई : कुर्ल्यातील गांधी मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले. शासनाच्या वतीने नायब तहसीलदार महेश मिसाळ यांनी उपस्थित राहत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यात ज्येष्ठ नागरिकांच्यासोबत युवा मंडळी सामील झाली होती. ज्येष्ठ नागरिक दिमा (अण्णा) प्रभुदेसाई, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, भास्कर सावंत, विश्वास कांबळे, उमेश गायकवाड, संजय घोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. यात गांधी मैदान अतिक्रमणमुक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेला हस्तांतरित करणे, सुरक्षा भिंत उभारणे, मैदानातील मोडकळीस आलेला स्टेज निष्कासित करणे, मैदानात क्यूआर कोड स्कॅनिंग मशीन व सीसीटीव्ही बसविणे आणि पालिकेने मैदान विकसित करणे या मुद्यावर जोर देण्यात आला. नायब तहसीलदार महेश मिसाळ यांनी निवेदनाचा स्वीकार करत तात्काळ कारवाईची ग्वाही दिली.
गांधी मैदान विकसित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:06 AM