Join us  

गांधींची स्वाक्षरी लिलावात

By admin | Published: December 13, 2014 1:23 AM

लिलावात पुरातन काळातील पदके, नाणी, चलनी नोटा यांचा समावेश असून, 14 डिसेंबर रोजी रॉयल ओक बँक्वेट्स, जहांगीर कला दालनाजवळ पार पडणार आहे.

मुंबई : तोडीवाला लिलावगृहाने त्यांचा 91वा लिलाव आयोजित केला आहे. या लिलावात पुरातन काळातील पदके, नाणी, चलनी नोटा यांचा समावेश असून, 14 डिसेंबर रोजी रॉयल ओक बँक्वेट्स, जहांगीर कला दालनाजवळ पार पडणार आहे. या लिलावात 1931 साली एका पारशी पत्रकाराने महात्मा गांधीजींची मुलाखत घेतली होती. त्या वेळी घेतलेली त्यांची स्वाक्षरी हे लिलावाचे वैशिष्टय़ आहे.
सम्राट अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांच्या काळातील अनेक चांदी आणि सोन्याची नाणी या लिलावात समाविष्ट केली आहेत. ही नाणी 6 ते 1क् लाखांत विकली जाण्याची शक्यता लिलावगृहातून व्यक्त केली जात आहे. तसेच 5क्क् विविध नाणी, बँकांच्या चलनी नोटा आणि पदकं, भारतीय नाणो परंपरेतील नाणी व हाताने पाडलेली नाणी यांचा समावेश आहे. तर 24क्क् वर्षापूर्वीची चांदीची नाणी 3 हजार रुपयांना तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील 1,6क्क् वर्षे जुने सोन्याचे नाणो अंदाजे 5क् हजारांना विकले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुघलांनंतर अवध, आसाम, बडोदा, बिकानेर, जयपूर, इंदौर संस्थांच्या अधिपत्याखाली तयार नाण्यांचाही समावेश केला आहे. अनेक भारतीय धुरिणांना व्हिक्टोरिया राणीने दिलेली पदकं, पंचम जॉर्जची प्रतिमा असलेली 1917 सालची एक रुपयाची नोट, अशा चलनी नोटाही या लिलावात असतील. (प्रतिनिधी)