...तर शाळेचे वर्ग भरणार म्हाडा कार्यालयासमोर, मालवणीतील शिक्षकांची गांधीगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 02:14 AM2019-05-28T02:14:28+5:302019-05-28T02:14:34+5:30

मालवणीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप तेथील शिक्षक वर्गाकडून करण्यात येत आहे.

Gandhinagar teachers of Malvani, before the MHADA office, fill the school class | ...तर शाळेचे वर्ग भरणार म्हाडा कार्यालयासमोर, मालवणीतील शिक्षकांची गांधीगिरी

...तर शाळेचे वर्ग भरणार म्हाडा कार्यालयासमोर, मालवणीतील शिक्षकांची गांधीगिरी

Next

मुंबई : मालवणीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप तेथील शिक्षक वर्गाकडून करण्यात येत आहे. याच मागण्या पूर्ण करण्याची विनंती करण्यासाठी म्हाडा कार्यालयासमोरच शाळेचे वर्ग भरवून गांधीगिरी करण्याचा मार्ग त्यांनी निवडला आहे. वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयासमोर १० जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वर्ग भरवत आम्ही आमचा निषेध व्यक्त करणार आहोत. त्यासाठीचे वेळापत्रकदेखील आम्ही तयार केले असून याबाबत संबंधित विभागांशी पत्रव्यवहारदेखील करण्यात आला आहे, अशी माहिती वंदे मातरम् या शिक्षण संस्थेचे सचिव फिरोज शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मालाड पश्चिम येथील मालवणी हा अल्पसंख्याक विभाग आहे.
त्यामुळे या ठिकाणी असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तसेच वारंवार विनंती करूनदेखील शाळेसाठीचे राखीव भूखंड
अनुदानाने देण्याच्या मागणीवर काहीही पावले उचलली जात
नाहीत. परिणामी, म्हाडा कार्यलयासमोरच आता वर्ग भरवत गांधीगिरी करण्याचे शिक्षकवर्गाने ठरवल्याची माहिती फिरोज शेख यांनी दिली आहे.

Web Title: Gandhinagar teachers of Malvani, before the MHADA office, fill the school class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.