"राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे", मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 04:48 PM2024-09-07T16:48:48+5:302024-09-07T16:49:33+5:30

Ganesh Chaturthi 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गणरायाचं आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना.

Ganesh Chaturthi 2024: "May the people of the state get happiness and prosperity", Chief Minister Eknath Shinde message to idol ganesha | "राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे", मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे!

"राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे", मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे!

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त आज 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गणरायाचं आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना. प्रत्येक गणोशोत्सव एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येतो. सगळीकडे मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचं दर्शन घडतं. सगळ्या जगाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले असते. या काळात महाराष्ट्राच्याच नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसांत उत्साह-जोश दिसतो.

हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. यंदा राज्यात सगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला आहे, त्यामुळं शेतकरी बांधवामध्येही उत्साह आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. पण सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सगळी मदत केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच, गणेशाची मनोभावे सेवा करतानाच, आपण सामाजिक बांधिलकची जाणीव ठेवूया. गरजू लोकांना मदतीचा हात द्या. आपण पर्यावरणाची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आपले सणवार हे निसर्गाला पूरक असे असतात. त्यामुळे निसर्गाचं जतन-संवर्धन होईल, ही बाब लक्षात घेऊन सण साजरे करावेत, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

राज्य शासनाने अनेक चांगल्या सामाजिक योजना सुरु केल्या आहेत, देशपातळीवर त्याचं कौतुक होतं आहे. शेतकरी युवक महिला सर्वच स्तरातील घटकांचा विचार करून शासन सगळ्यांना सक्षम करण्यासाठी पाठबळ देत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे. या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत. परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे. देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा असणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Web Title: Ganesh Chaturthi 2024: "May the people of the state get happiness and prosperity", Chief Minister Eknath Shinde message to idol ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.