गणेशभक्तांचे रविवारी होणार ‘मेगा’हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:21 AM2019-08-31T06:21:48+5:302019-08-31T06:22:01+5:30

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा

Ganesh devotees will have 'Mega' block on Sunday | गणेशभक्तांचे रविवारी होणार ‘मेगा’हाल

गणेशभक्तांचे रविवारी होणार ‘मेगा’हाल

Next

मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे गणेशभक्तांना गर्दीच्या समस्येला सामोरे जावे लागेल. मात्र, पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेतला जाणार नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.


मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगादरम्यान सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे सुटणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाºया जलद मार्गावरील सर्व लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबा घेतील.


हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशीदरम्यान दोन्ही दिशेकडे सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत, तसेच सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत सीएसएमटीहून पनवेल, बेलापूर दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे, सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूरहून सीएसएमटीच्या दिशेने एकही लोकल धावणार नाही.


ब्लॉक काळात पनवेल/अंधेरी या दरम्यानची लोकलसेवा रद्द करण्यात येईल. सीएसएमटी ते वाशी या स्थानकांदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक काळात विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. यासह प्रवाशांसाठी ट्रान्सहार्बर मार्गावरून ठाणे ते वाशी/नेरूळ या दरम्यान लोकल सेवा उपलब्ध असेल.


रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच
ब्लॉकदरम्यान दादर आणि सीएसएमटीहून सुटणाºया एक्स्प्रेस मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. त्यानंतर, दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकाहून चालविण्यात येईल. या गाडीतील प्रवाशांसाठी दादर स्थानकातून ३.४० वाजता दादर
ते दिवा गाडी चालविण्यात येईल. ही गाडी ठाणे स्थानकात ४.०६ वाजता आणि दिवा स्थानकात ४.१६ वाजता पोहोचेल, असे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.


प्रवाशांना वेठीला धरण्याचे काम
वर्षातून एकदा गणेशोत्सव येतो. सोमवारी बाप्पाचे आगमन होत आहे. तरीही रविवारी मध्य रेल्वे प्रशासन मेगाब्लॉक घेऊन गणेशभक्तांचे हाल करणार आहे. मध्य रेल्वे प्रशासन मेगाब्लॉक घेऊनसुद्धा अनेकदा तांत्रिक बिघाड होतोच. रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टीकालीन वेळापत्रक चालविण्यात आले. यामध्ये अनेक लोकल रद्द केल्याने प्रवाशांना (विशेषत महिलांना) गर्दीला सामोरे जावे लागले. यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. मध्य रेल्वे प्रशासन सणासुदीच्या काळात ब्लॉक घेऊन प्रवाशांना नाहक वेठीस धरत आहे.
- नंदुकमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था

Web Title: Ganesh devotees will have 'Mega' block on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल