गणेश विसर्जन : बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज, ४४५ विसर्जन स्थळे सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 03:04 AM2020-08-31T03:04:40+5:302020-08-31T03:05:22+5:30

संसर्गजन्य रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव होत असल्यामुळे सर्वच ठिकाणी नागरिकांनी शारीरिक दुरीकरण पाळून आणि संबंधित सूचनांचे पालन करत गणरायाला निरोप दिला जाणार आहे.

Ganesh Immersion: Municipal Corporation ready to bid farewell to Bappa, 445 immersion sites ready | गणेश विसर्जन : बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज, ४४५ विसर्जन स्थळे सज्ज

गणेश विसर्जन : बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज, ४४५ विसर्जन स्थळे सज्ज

googlenewsNext

मुंबई : कोरोनासारख्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिकेची यंत्रणा गणेशाच्या विसर्जनासाठी सुसज्ज असून पालिकेने ४४५ विसर्जन स्थळे निश्चित केली आहेत. यासाठी सुमारे २३ हजार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. अधिकारी-कर्मचारीही तैनात असणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत अधिकारी-कर्मचारी व अन्य कामगार यांची संख्या यावर्षी तिप्पट करण्यात आली आहे.

नागरिकांना शाडूमातीच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन हे आपल्या घरच्या किंवा सोसायटीच्या स्तरावर करण्याचे आवाहन केले आहे. संसर्गजन्य रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव होत असल्यामुळे सर्वच ठिकाणी नागरिकांनी शारीरिक दुरीकरण पाळून आणि संबंधित सूचनांचे पालन करत गणरायाला निरोप दिला जाणार आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणे मोठ्या मिरवणुका नाहीत. ध्वनिप्रदूषण-वायुप्रदूषणही तुलनेने कमी असल्याचे जाणवत आहे. दरवर्षी अनुभवायला येणारी वाहतूक कोंडीही यंदा जाणवत नाही. समुद्र-तलाव-खाडी इत्यादी ठिकाणी महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार स्वत: श्रीगणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी न जाता आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन हे महापालिकेच्या कर्मचारी/स्वयंसेवक यांच्याद्वारे करत आहेत.
यंदा पहिल्यांदाचा दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करताना वाद्यवृंदांचा वापर झालेला नाही. त्यामुळे यंदाचे दीड दिवसांचे गणेश विसर्जन ध्वनिप्रदूषण टाळत शांततेत पार पडले. मुंबईकरांनी जगासमोर यानिमित्ताने एक चांगला आदर्श घालून दिला आहे.

कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात वाढ
1गेल्या वर्षीच्या तुलनेत कृत्रिम तलावांमध्ये श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या टक्केवारीत यंदा तब्बल ५७.७६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
2गेल्या वर्षी ३ सप्टेंबर, २०१९ रोजी कृत्रिम तलावांमध्ये १४ हजार ४९० एवढ्या दीड दिवसांच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.
3यंदा या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये २२ हजार ८५९ एवढ्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

निर्माल्यापासून सेंद्रिय खत, उद्यानात उपयोग
गणेशोत्सवादरम्यान पहिल्या पाच दिवसांत म्हणजेच २२ ते २६ आॅगस्ट दरम्यान एकूण १ लाख ३० हजार ३१ किलो एवढे निर्माल्य संकलन झाले. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४१ हजार किलो एवढे निर्माल्य संकलन आर मध्य विभागात झाले आहे. संकलित करण्यात आलेल्या या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येते. हे खत पालिकेच्या विविध उद्यानांमध्ये उपयोगात आणले जाते.

गोरेगावकरांना मोबाइल विसर्जन वाहनांची सुविधा
मुंबई : गोरेगाव (पी दक्षिण) विभागाने जय्यत तयारी करून ४ पारंपरिक विसर्जन स्थळांसोबतच ६ कृत्रिम तलाव आणि नावीन्यपूर्ण संकल्पना राबवत २ सजवलेल्या ट्रकवर ठेवलेल्या मोबाइल विसर्जन वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या विकेंद्रीकरणाच्या नियोजनामुळे पारंपरिक विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळणे व परिणामी कोविड १९ विषाणूचा प्रसार रोखणे शक्य होत आहे. दीड दिवस, पाच दिवस, गौरी गणपती व सात दिवसांचा कोरोना रोखण्यासाठी आणि आता गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतलेल्या परिश्रमांना गोरेगावकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
अनेकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन सोसायट्यांच्या आवारातच केल्यामुळे गर्दीवर नियंत्रण राखणे शक्य झाले. विसर्जन स्थळांवरील गर्दी बरीच कमी जाणवत आहे. सेवाभावी संस्थांनीही मनपाच्या मूर्ती संकलन वाहन सुविधेचा वापर करून प्रशासनाला सहकार्य केले आहे. अशी माहिती पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी दिली.

मुंबई शहरात एकूण ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत.
विसर्जन शक्यतो घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे.
नैसर्गिक विसर्जन स्थळांवर मूर्ती संकलनाची व्यवस्था आहे.
नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे.
महापालिकेच्या २४ विभागांमध्ये सुमारे १६८ कृत्रिम तलाव आहेत.
कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्थळांवर जाण्यास मनाई आहे.
महापालिकेच्या प्रत्येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे आहेत.
नैसर्गिक विसर्जन स्थळांवर मूर्ती संकलनाची व्यवस्था आहे.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये असणाºया मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे.
सील्ड इमारतींमधील गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी घरीच व्यवस्था करावयाची आहे.
पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्या मंडपातच करून घेणे बंधनकारक आहे.
ट्रकवर टाक्या किंवा इतर व्यवस्था करून फिरती विसर्जन स्थळे निर्माण केली आहेत.
गणेशोत्सवा दरम्यान कोणत्याही मिरवणुकीस परवानगी नाही.
मास्क, सॅनिटायझर वापरणे इत्यादी आरोग्य संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे.

Web Title: Ganesh Immersion: Municipal Corporation ready to bid farewell to Bappa, 445 immersion sites ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.