Join us  

Ganesh Mahotsav 2024: आमच्यासाठी प्रत्येक भाविक व्हीव्हीआयपी

By सचिन लुंगसे | Published: September 02, 2024 1:15 PM

Lalbaugcha Raja: गणेशभक्तांचे श्रद्धेय स्थान म्हणजे लालबागचा राजा. दरवर्षी गणेशोत्सवात राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी होते. या गर्दीचे व्यवस्थापन कसे केले जाते, या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्याशी लोकमतचे उपमुख्य उपसंपादक सचिन लुंगसे यांनी केलेला वार्तालाप... 

गणेशभक्तांचे श्रद्धेय स्थान म्हणजे लालबागचा राजा. दरवर्षी गणेशोत्सवात राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी होते. या गर्दीचे व्यवस्थापन कसे केले जाते, या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्याशी लोकमतचे उपमुख्य उपसंपादक सचिन लुंगसे यांनी केलेला वार्तालाप... 

- बाळासाहेब कांबळेअध्यक्ष, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

- व्हीव्हीआयपी लोकांमुळे रांगा ताटकळत राहतात?आपण व्हीव्हीआयपी लोकांचा आदर करतो. केंद्रीय मंत्र्यांपासून राज्यातील मंत्र्यांचा यात समावेश असतो. बॉलीवूडपासून मोठे कलाकारही येतात. आपण त्यांना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दहा-दहा तास रांगेत थांबवू शकत नाही. आपण त्यांचे आदरातिथ्य करतो. त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले जाते. आमच्या रांगा त्यांच्यासाठी ताटकळत राहत नाहीत. आमच्याकडे येणारा प्रत्येक भाविक हा आमच्यासाठी व्हीव्हीआयपी आहे. 

- लालबागच्या राजाचे कार्यकर्ते भाविकांशी वाद घालतात, असा आरोप होतो...आमचे पोलिसांशी वाद होत नाही आणि झाले तर किरकोळ असतात. छोटे-मोठे वाद जागेवरच सोडवले जातात. आमच्यासाठी भाविकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. दोन लोकांचा किरकोळ वादाचा विषय आम्ही वाढवत नाही. 

- यंदा सामान्य भाविकांचे किती तासांत दर्शन होईल?मुखदर्शनाच्या रांगेतून तीन तासांत दर्शन शक्य होईल. चरणस्पर्शच्या रांगेतून पाच तासांत दर्शन होईल. चरणस्पर्शाच्या रांगेसाठी दिग्विजय मिल परिसरात मंडप घातला आहे. सुमारे साडेचार हजार भाविक यात सामावू शकतील. हाफकीनपर्यंत ही रांग जाते. किमान दोन ते अडीच किमी रांग असते. मुखदर्शनाची रांग भायखळ्यापर्यंत असते. ही रांग सुमारे चार ते पाच किमी असते.

- यंदाच्या गणेशोत्सवात सुरक्षा व्यवस्था कशी असेल?चार ते पाच एजन्सीकडे सुरक्षा व्यवस्थेचे काम देण्यात आले आहे. सुमारे  २०० बाउन्सर्स असतील. ३ हजार पोलिस असतील. आमचे सुमारे २ हजार कार्यकर्ते सुरक्षेची व्यवस्था पाहतात. संशयास्पद हालचालींवर आमचे लक्ष असते. जागोजागी बॅगेज स्कॅनिंग असणार आहे. डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर असणार आहेत. हँड मेटल डिटेक्टर असणार आहेत. साध्या वेशात पोलिस असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात एकूण तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे इन्स्टॉल केले जातील.

- राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना काय सुविधा देणार?चरणस्पर्शाच्या रांगेत आरामदायी मंडप आहे. कूलिंग आहे. पाणी, नाश्ता आहे. हिरकणी कक्ष आहे. मेडिकल सेंटर आणि डॉक्टर असणार आहेत. नर्सेस असणार आहेत. शौचालय असणार आहे. स्वच्छता राहील, याची काळजी घेतली जाईल. कॅमेरे, गार्ड, सुरक्षारक्षक असणार आहेत. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये दीड ते दोन हजार महिला कार्यकर्त्या आहेत. 

टॅग्स :लालबागचा राजागणेशोत्सव