Ganesh Mahotsav: बाप्पा पावला! लाइटिंगचा खर्च कमी झाला, मंडळांना मिळणार घरगुती दरानेच वीज, महावितरणचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 08:41 AM2022-08-29T08:41:47+5:302022-08-29T08:43:02+5:30

Ganesh Mahotsav: सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

Ganesh Mahotsav: Ganesh Mandals will get electricity at household rates, Mahadistribution decision | Ganesh Mahotsav: बाप्पा पावला! लाइटिंगचा खर्च कमी झाला, मंडळांना मिळणार घरगुती दरानेच वीज, महावितरणचा निर्णय

Ganesh Mahotsav: बाप्पा पावला! लाइटिंगचा खर्च कमी झाला, मंडळांना मिळणार घरगुती दरानेच वीज, महावितरणचा निर्णय

googlenewsNext

मुंबई : गणेश उत्सव मंडळांना महावितरणकडून घरगुती दरानेच वीज देण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. 
गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी  घेतली जात नाही. घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. हे प्रकार टाळण्यासाठी स्वस्त विजेचे पर्याय मंडळांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. 
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन ते अडीच वर्षांनी गणेशोत्सव यंदा दणक्यात साजरा होतोय. मात्र, यंदा महागाईनेही कंबरडे मोडले असून आलेल्या वर्गणीतून गणेशोत्सव साजरा करताना मंडळांच्या अक्षरश: नाकीनऊ येणार आहे. मात्र, यंदा महावितरणने मंडळांना घरगुती दरानेच वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 

धोके टाळण्यासाठी काय ?
     पावसाची शक्यता असल्याने वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी.
     मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी.
     मंडपातील वीज यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्या.
     स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्या.

प्रति युनिट / दर 
१०० - ४ रूपये ७१ पैसे 
१०१ ते ३०० - ८ रुपये ६९ पैसे
३०१ ते ५०० - ११ रुपये ७२ पैसे 
५०० युनिटपेक्षा अधिक 
- १३ रुपये २१ पैसे 
मदतीची गरज भासल्यास 
येथे कॉल करा
- १९१२, १८००१०२३४३५, १८००२३३३४३५ 

विद्युत प्रवाह येऊ शकतो 
वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तूंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड देण्यात यावा.

वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून प्राणांतिक अपघात घडतात. त्यामुळे उपाय योजनांमध्ये तडजोड करू नये.

Web Title: Ganesh Mahotsav: Ganesh Mandals will get electricity at household rates, Mahadistribution decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.