Join us

गरीब, हुशार विद्यार्थ्यांना गणेश मंडळांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 6:07 AM

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि गुणवान विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि गुणवान विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. गरीबी आणि विषम परिस्थितीतही दहावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी गणेशोत्सव मंडळांकडून अर्थसाहाय्य दिले जाईल.मंगळवारी धर्मादाय आयुक्त कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अखिल महाराष्ट्र गणेश महामंडळाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, समन्वय समितीचे नरेश दहिबावकर, सुरेश सरनोबत यांच्यासह लालबागचा राजा, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव आदी राज्यभरातील विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, दारिद्र रेषेखालील कुंटुंबातील दहावीत ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाºया १० विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च गणेश मंडळ करतील. गरिबीमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाया जाऊ नये, या भावनेतून हा निर्णय घेतल्याचे राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सांगितले. संबंधित विद्यार्थ्यांनी जिल्हा धर्मादाय कार्यालयात गुणपत्रिका, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहनही डिगे यांनी केले.एक खिडकी योजनागणेशोत्सव मंडळांच्या अडचणी दूर करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात एक खिडकी योजना सुरू केली आहे. धर्मादाय उपायुक्त भरत व्यास यांच्याकडे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांच्या धर्मादाय आयुक्तालयाशी निगडित अडचणींचे निराकरण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :गणेशोत्सव