Join us

गणेश मूर्तिकारांना शाडूची, माती मोफत देणार; पालिका उपायुक्तांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 06:41 IST

गणेशमूर्तींसाठी मुंबईतील मूर्तिकारांना लवकरच शाडूची माती मोफत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानसभेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गणेशमूर्तींसाठी मुंबईतील मूर्तिकारांना लवकरच शाडूची माती मोफत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानसभेत केली. उद्धव सेनेचे आमदार अजय चौधरी यांनी एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान विधानसभेत या संदर्भात मागणी केली होती. आगामी गणेशोत्सवात श्रीगणेशमूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना सरकारकडून विनामूल्य शाडूची माती उपलब्ध करून देण्यात यावी,  अशी मागणी अजय चौधरी यांनी केली. त्यावर शाडूची माती मोफत देण्यात येईल आणि या संदर्भात पालिका आयुक्तांना सूचना केली जाईल, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.  गेल्या वर्षीही मूर्तिकारांना विनामूल्य शाडूची माती देण्यात आली होती.

मंडळांना शाडूची माती देण्याचा निर्णय पालिकेने मागील वर्षीच घेतला होता. माती मोफत दिली जाणार आहे. ज्या मंडळाची जेवढी मागणी असेल तेवढी माती दिली जाईल. - रमाकांत बिरादार, पालिका उपायुक्त

टॅग्स :मुंबईगणेशोत्सव