गणेशांनी दिली आव्हाडांना धोबीपछाड

By admin | Published: May 23, 2015 10:43 PM2015-05-23T22:43:23+5:302015-05-23T22:43:23+5:30

नवी मुंबईत एकहाती सत्ता खेचून आणत आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपला वरचष्मा राखणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईकांचे वजन पक्षात पुन्हा वाढले आहे.

Ganesh said that the guests are not happy | गणेशांनी दिली आव्हाडांना धोबीपछाड

गणेशांनी दिली आव्हाडांना धोबीपछाड

Next

ठाणे - नवी मुंबईत एकहाती सत्ता खेचून आणत आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपला वरचष्मा राखणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईकांचे वजन पक्षात पुन्हा वाढले आहे. परंतु दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाडांचे पाय आता खोलात रुतु लागले असून त्यांचे पक्षातील वजन घटले आहे.
पक्षातील एकामागून एक जबाबदाऱ्या नाईक यांच्या खाद्यांवर पडू लागल्या असून आव्हाडांना मात्र यापासून दूर केले जात आहे. ठाणे जिल्ह्यातील पक्षकारणाची जबाबदारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच आव्हाडांकडे दिल्याची घोषणा केली होती. त्यामुळे तर, जिल्ह्याच्याही राजकारणातून नाईकांचे पानीपत झाले. असा कांगावा आव्हाड समर्थकांनी सुरु केला होता. परंतु नवी मुंबई मनपा जिंकून आणि जिल्हा बँकेवर आपल्या समर्थकाला बसवून नाईकांनी आपले राजकीय बस्तान पक्षकारण आणि सत्ताकारण यात मजबूत केले आहे. तर पक्षात आव्हाडांचे स्थान हे केवळ कळवा- मुंब्य्राचे आमदार एवढेच राहिले आहे.
राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचे नाव चर्चेत आणून त्यांच्या समर्थकांनी अंगलट येणारी खेळी खेळली. प्रदेश अध्यक्षपद तटकरेंकडेच राहिले आणि आव्हाडांच्या नशीबी तटकरेंचा रोष पत्करणे आले. एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादीत चांगलाच दबदबा होता. शहर अध्यक्षपासून ते प्रदेश कार्याध्यक्ष आणि मंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला गड राखला असला तरी, त्यांचे मताधिक्य कमी झाले आहे. परंतु याच निवडणुकीच्या निमित्ताने नवी मुंबईत गणेश नाईक यांचा पराजय झाला, आणि त्यांचे पक्षातीलच अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. त्यात भाजपाच्या वाढत्या प्रस्तामुळे नवी मुंबईत नाईकांना महापालिका राखण्याचे मोठे आव्हान होते. अखेर मागील महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत नाईकांनी नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीची टीक टीक वाजवली आणि पुन्हा पक्षाला याची दखल घ्यावी लागली.
त्यानंतर नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही आव्हाडांपेक्षा नाईकांचाच वरचष्मा दिसून आला. त्यांनी आखलेल्या व्युव्हरचमुळेच बँकेवर सहकार पॅनल निवडून आले आणि त्यांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता बाबाजी पाटलांच्या रुपाने पुन्हा एकदा अध्यक्षपदी विराजमान झाला. त्यामुळे येथेही आव्हाडांची पिछेहाट झाली. त्यानंतर आता वसई - विरार महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देखील गणेश नाईकांवर सोपविण्यात आल्याने आव्हाडांवर हात चोळत बसण्याची पाळी आली आहे.

आव्हाड ठरणार नाममात्र !
४ठाणे महापालिकेत वर्चस्व राहावे म्हणून गेली काही वर्षे आव्हाडांचे समर्थक मनोज प्रधान यांच्यावर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडून पक्षबांधणी न झाल्याने अखेर त्यांनाही पदावरुन हटविण्यात आले आहे. आता हे पद आपल्याकडे राखण्यासाठी डावखरे गटाने मोर्चेंबांधणी सुरु केली आहे. हे पदही आव्हाड गटाकडून हिसकावून घेतल्यास आव्हाड हे नाममात्र राहणार आहेत.

Web Title: Ganesh said that the guests are not happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.