Ganesh Visarjan 2024 Live: 'लालबागचा राजा'चं विसर्जन; साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 10:02 AM2024-09-17T10:02:13+5:302024-09-18T10:51:39+5:30

Maharashtra Ganesh Visarjan 2024 Live Updates: आज मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पांची मोठ्या उत्साहात मिरवणूक सुरु आहे. पुण्याच्या मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन रात्री ८ वाजताच्या सुमारास पार पडले. आता मुंबई, पुण्यासह इतर शहरांमधील मोठे बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले.

ganesh-visarjan-2024 Live mumbai pune maharashtra ganpati visarjan traffic updates anant chaturdashi latest news | Ganesh Visarjan 2024 Live: 'लालबागचा राजा'चं विसर्जन; साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप

Ganesh Visarjan 2024 Live: 'लालबागचा राजा'चं विसर्जन; साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप

Maharashtra Ganesh Visarjan 2024 Live Updates : आज मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पांची मोठ्या उत्साहात मिरवणूक सुरू आहे. सकाळपासूनच मुंबईतील गणेश मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. मुंबईतील बहुतांश मोठ्या मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर केले जात आहे. पुण्याच्या मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन रात्री ८ वाजताच्या सुमारास पार पडले. आता मुंबई, पुण्यासह इतर शहरांमधील मोठे बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. विविध शहरांमध्ये बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक उद्या सकाळपर्यंत सुरु असेल. जाणून घ्या या संबंधीचे सर्व अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

18 Sep, 24 : 10:26 AM

'लालबागचा राजा'चं विसर्जन; साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप

गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला भाविकांनी अखेरचा निरोप दिला आहे, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. तराफावरुन खोल समुद्रात विसर्जन करण्यात आले आहे. लालबागच्या राजाची मिरवणूक २४ तास चालली. 
 

18 Sep, 24 : 10:03 AM

लालबागच्या राजाला बोटींची सलामी

लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीवर बोटींनी सलामी दिली. चौपाटीवर लालबागच्या राजाचा जयघोष सुरू आहे. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. २४ तासांपेक्षा जास्तवेळ लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू होती.

18 Sep, 24 : 09:56 AM

गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गर्दी

लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी झाली आहे. लालबागच्या राजाला तराफ्यावरुन समुद्रात नेण्यात आले. राजासाठी खास तराफा बनवण्यात आला आहे.

18 Sep, 24 : 08:37 AM

लालबागचा राजा २० तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन होणार

लालबागच्या राजाची गेल्या २० तासांपासून मिरवणूक सुरू आहे. आता मिरवणूक चौपाटीवर दाखल झाली आहे. काही वेळातच विसर्जन होणार आहे.

18 Sep, 24 : 08:15 AM

लालबागचा राजा २० तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन होणार

लालबागच्या राजाची गेल्या २० तासांपासून मिरवणूक सुरू आहे. आता मिरवणूक चौपाटीवर दाखल झाली आहे. काही वेळातच विसर्जन होणार आहे.

18 Sep, 24 : 07:53 AM

पुण्यात विसर्जन मिरवणूक रखडली; लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

पुण्यात अजून विसर्जन मिरवणूक सुरू आहे, तर मुंबईत लालबागचा राजा गिरगाव चौपाटी परिसरात दाखल झाला आहे.

17 Sep, 24 : 11:15 PM

साऊंड सिस्टिम अन् वीजेच्या रोषणाईने गाजली कोल्हापूरची बाप्पाची मिरवणूक

कोल्हापूर: मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिम आणि वीजेची रोषणाई याने गणेश विसर्जन मिरवणुकीतील उत्साहाला उधाण आले. मोठ्या गणेश मूर्ती सामील झाल्याने मिरवणूक मार्गावर प्रचंड गर्दी झाली. गंगावेस, पापाची तिकटी,महाद्वार, मिरजकर तिकटी या ठिकाणी अधूनमधून चेंगराचेंगरी होतानाही दिसली.

17 Sep, 24 : 08:57 PM

जळगाव: बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत 'बेटी बचाव'चा संदेश

जळगाव: सार्वजनिक मंडळांसह घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पाला आज जयघोष करत मेहरुन तलाव परिसरात निरोप देण्यात आला. मानाच्या महानगरपालिकेच्या गणपतीचे संध्याकाळी साडेसहा वाजता विसर्जन करण्यात आले. त्याआधी सार्वजनिक मंडळांना दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. त्यात एका मंडळाने 'बेटी बचाव'चा सामाजिक संदेश दिला.

17 Sep, 24 : 08:49 PM

कोल्हापूर: दणदणाट अन् लखलखाट... बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची धूमधाम

कोल्हापूर: सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीत सुरू असलेल्या दणदणाटाला संध्याकाळी प्रकाशाच्या लखलखाटाची जोड मिळाली. उत्साहात सुरू असलेल्या मिरवणुकीला  गेल्या वर्षीच्या तुलनेत वेग आला असून पोलिसांनी कुठेही मध्ये अंतर पडणार नाही याची दक्षता घेतली आहे.

17 Sep, 24 : 08:47 PM

ठाणे: मुंब्रा रेतीबंदर येथे बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

 

ठाणे: मुंब्रा रेती बंदर येथे गणपती विसर्जन करण्यास संध्याकाळच्या वेळी सुरुवात झाली. भाविकांनी घरच्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला.

17 Sep, 24 : 08:05 PM

पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पाचे विसर्जन

पुण्यातील कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या पाचही गणपती बाप्पाचे विसर्जन संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास झाले. आता शहरातील इतर गणपतींचे विसर्जन सुरू होईल.

17 Sep, 24 : 07:56 PM

धुळे: विसर्जन मिरवणुकीवेळी ट्रॅक्टरखाली आल्याने ३ बालके ठार

धुळे: शहरातील चितोड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तीन बालके ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

17 Sep, 24 : 07:46 PM

नांदेड: गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

नांदेडमध्ये गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा तालुक्यातील घोडज येथील मन्याड नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. १७ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. संदीप आनंदा घोडजकर असे मयत युवकाचे नाव आहे.

17 Sep, 24 : 07:44 PM

इंदापूर: विसर्जनावेळी मुलगा नदीपात्रात बुडाला; नीरा नरसिंहपूरची घटना, शोधमोहीम सुरु

इंदापूर मधील नीरा नरसिंहपूर येथील नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी आलेल्यांपैकी एक मुलगा पाण्यात बुडाला. अनिकेत विनायक कुलकर्णी (रा. परांडा) असे मुलाचे नाव आहे. शोधकार्य सुरू आहे.

17 Sep, 24 : 07:40 PM

नांदेड: गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

नांदेडमध्ये गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा तालुक्यातील घोडज येथील मन्याड नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. १७ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. संदीप आनंदा घोडजकर असे मयत युवकाचे नाव आहे.

17 Sep, 24 : 05:29 PM

पुणे: मानाच्या गणपतींना २०० मीटर अंतर पार करायला लागले तब्बल ५ तास

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका कासव गतीने सुरू आहेत. मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची मिरवणूक साडे दहा वाजता सुरु झाली. तब्बल पाच तासाने मिरवणूक टिळक पुतळ्याजवळ म्हणजेच दोनशे मीटरवर पोहोचली. मानाचा पहिला गणपती अद्याप अलका चौकात पोहोचला नसल्याने यंदा विसर्जनाच्या मिरवणुका किती तास चालणार? याबाबत चर्चा रंगली आहे.

17 Sep, 24 : 04:26 PM

बाप्पा लवकर या... अशी साद घालत अकोलेकरांकडून बाप्पाला भावपूर्ण निरोप 

अकोला-गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साद आबालवृद्धांसहबाळ गोपालांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. शहरातील खोलेश्वर गणेश घाट, निमवाडी, हरिहर पेठ आणि हिंगणा रोड गणेश घाटांवर हजारो घरगुती गणेश मूर्तींचे जड अंतकरणाने भाविकांनी विसर्जन केले. 
 

17 Sep, 24 : 04:20 PM

श्री गणेशोत्सव मंडळांकडून विविध प्रात्यक्षिके सादर, अघोरी नृत्याने वेधले आबालवृध्दांचे लक्ष

खामगाव: श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी श्री गणेशोत्सव मंडळांकडून विविध प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच विविध देखावेही सादर करण्यात आले. यात वंदे मातरम नवयुवक गणेशोत्सव मंडळाने सादर केलेल्या अघोरी नृत्याने आबालवृध्दांचे लक्ष वेधले. 

17 Sep, 24 : 03:13 PM

कोल्हापुरात मिरवणुकीत रंग भरायला सुरूवात, जल्लोषाचा केंद्रबिंदू मिरजकर तिकटी

कोल्हापूर : शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत आता रंग भरायला सुरूवात झाली आहे. धनगरी ढोल, ढोल ताशा पथक, लेझीम पथक, गौराईची गाणी आणि ध्वनीयंत्रणेवरील दणकेबाज गाणी यामुळे शहरातील मिरवणुकीचा दणदणाट अनुभवायला नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.  मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी हा जल्लोषाचा केंद्रबिंदू असून या ठिकाणी मोठ्या मंडळाच्या समर्थकांनी तळच ठोकला आहे. 

17 Sep, 24 : 02:16 PM

कोल्हापूर महानगरपालिकेमधील सार्वजनिक गणपतीचे पर्यावरण पूरक विसर्जन कुंडामध्ये विसर्जन

कोल्हापूर महानगरपालिकेमधील सार्वजनिक गणपती आज महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात पर्यावरण पूरक विसर्जन कुंडामध्ये  प्रशासक के. मंजूलक्ष्मी व उपायुक्त साधना पाटील यांच्या हस्ते विसर्जित करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला कर्मचारी व इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते

17 Sep, 24 : 01:34 PM

बंब बोले, हर हर महादेवाच्या जयघोषात मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणरायाच्या मिरवणुकीला प्रारंभ 

पुणे : बंब बोले, हर हर महादेवाचा गजर सोबत शंख नाद अशा भावपूर्ण वातावरणात शिवमुद्रा ढोल ताशा पथकाच्या ठेक्याने मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणरायाच्या मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ झाला.
 

17 Sep, 24 : 01:34 PM

ढोल ताशांचा गजर अन् बाप्पाच्या जयघोषात अकोल्यात गणेशोत्सव मिरवणुकीला प्रारंभ

अकोला: ढोल ताशांचा गजर, पुष्प पाकळ्यांची उधळण, बाप्पाचा सारखा जयघोष अशा भावपूर्ण वातावरणात मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता मानाच्या बाराभाई गणपतीचे पूजन करून व महाआरती करून सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. 

17 Sep, 24 : 01:32 PM

खामगावात चोख पोलीस बंदोबस्त, श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस शांततेत सुरूवात

घरगुती गणेशाचे पहाटेपासून तर सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला मानाचा लाकडी गणपती सहभागी झाल्यानंतर सकाळी ९.२५ वाजता फरशी येथून सुरुवात झाली.
 

17 Sep, 24 : 12:17 PM

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज

 मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव बांधून दिले आहेत. तसेच पारंपरिक नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही महापालिका आणि मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली आहे.

17 Sep, 24 : 12:08 PM

रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू

पुणे: रामजी की निकली सवारीचा ठेका अन् भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगाचा जयघोष करत श्री तांबडी जोगेश्वरीच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. समर्थ ढोल ताशा पथकाने समाधान चौकात रामजी की निकली सवारी गाण्यावर ठेका धरला. गुलाल आणि फुलांची उधळण करत जल्लोष केला. नागरिकांनीही या उत्साहात जयघोष करण्याचा आनंद लुटला. सर्वत्र जय श्रीरामचा गजर सुरू होता. 

17 Sep, 24 : 12:07 PM

गुलालाची उधळण, ढोल ताशा लेझीमचा गजर, मानाचा तिसरा पुण्याचा राजा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीचा जल्लोष

पुणे: दरवर्षीप्रमाणे नुसतीच गुलालाची उधळण, गुलाबी झालेले सगळे कार्यकर्ते, ढोल ताशांचा जोरदार गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याचा राजा मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाने आकर्षक वादन करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले. फुलांच्या सजावटीत सुर्यरथात विराजमान बाप्पा मिरवणुकीचे आकर्षण ठरले. तृतीयपंथियांचे शिखंडी पथकाने मिरवणुकीत उत्तम वादन केले. 

17 Sep, 24 : 12:06 PM

मुंबईसह राज्याभरात जल्लोषात गणपती बाप्पांच्या मिरवणुकीला सुरूवात

मुंबईसह राज्याभरात जल्लोषात गणपती बाप्पांच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. 
 

17 Sep, 24 : 11:16 AM

पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात, मानाचा पहिला कसबा गणपती समाधान चौकातून मार्गस्थ

पुणे: ढोल ताशाचा गजर अन् मोरयाचा जयघोषात पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती समाधान चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे मार्गस्थ झाला. 

17 Sep, 24 : 10:39 AM

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज

 मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव बांधून दिले आहेत. तसेच पारंपरिक नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही महापालिका आणि मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली आहे.

17 Sep, 24 : 10:23 AM

मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी होते तेव्हा...

मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी होते तेव्हा...

17 Sep, 24 : 10:20 AM

गिरगांव चौपाटीवर गणपती विसर्जनाची मोठी तयारी

मुंबईतील अनेक मंडळाच्या बाप्पांचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात येते, आज प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. चौपाटीवर संरक्षणासाठी पोलिस मोठ्या प्रमाणात आहेत, ट्रॅफिक पोलिसांनीही पार्किंगची व्यवस्था केली आहे. तर महापालिकेने कृत्रिम तलावही केले आहेत.

17 Sep, 24 : 10:17 AM

लालबागच्या राजासमोर कोळी नृत्य

मुंबईतील लालबागच्या राजा जवळ भाविकांनी मोठी गर्दी केली आहे, लालबागच्या राजासमोर कोळी नृत्य सुरू आहे. 

17 Sep, 24 : 10:15 AM

अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था

लाडक्या गणरायाला आज भक्तिभावाने निरोप दिला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्न पार पाडावे यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अडीच हजार वाहतूक पोलीस महत्त्वाच्या मार्गावर तैनात असणार आहेत. इस्ट-वेस्टची कनेक्टिव्हिटी सुरू राहण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर केला आहे. नवी मुंबईतून मुंबई विमानतळापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ असणार आहे. 

17 Sep, 24 : 10:13 AM

मुंबईतील गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला

आज मुंबईतील गणेश मंडळांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. सकाळपासूनच सुरूवातही झाली आहे. पोलिस प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. मिरवणुकांमध्ये मोठी गर्दी असती. यासाठी पोलिसांनी मुंबईत पोलिस बंदोबस्त लावला आहे. गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.  मोठ्या उत्साहान विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

Web Title: ganesh-visarjan-2024 Live mumbai pune maharashtra ganpati visarjan traffic updates anant chaturdashi latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.