ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार आॅनलाईन बुकींगच्या माध्यमातून गणेश विसर्जन करता येणार आहे. तसेच शहरात आजही असे काही भाग आहेत, ज्या ठिकाणी कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. अशा हॉटस्पॉट आणि कनटेंमेट झोन मधील ३९ भागातील गणेश भक्तांना घरच्या घरीच बाप्पांचे विसर्जन करावे लागणार आहे. यामध्ये २४ स्पॉट हे झोपडपटटी भागात असून १५ स्पॉट हे इमारतीचे असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला कोरोना बाधीत रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत आहे. परंतु गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होऊ नये, सोशल डिस्टेसींगचे पालन केले जावे या अनुषंगाने पालिकेच्या माध्यमातून गणेशोत्सवाची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या माध्यमातून काही नियम घालून देण्यात आले आहे. तसेच शहरात गणेश मुर्ती स्विकृती केंद्राची संख्याही वाढविण्यात आली आहे. तर नागरीकांना यंदा घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात गर्दी करु नये, गणपती आणण्यासाठी जातांनाही काळजी घ्यावी, असे आवाहनही पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. परंतु आजही शहरातील काही महत्वाच्या भागांमध्ये कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आजही वाढत आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील काही भाग कंटनेमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. यामध्ये ३९ हॉटस्पॉटचा समावेश आहे. यामध्ये २४ हॉटस्पाट हे झोपडपटटी भागात आहेत, तर १५ हॉटस्पॉटही इमारतींच्या ठिकाणी आहेत. इमारतींच्या ठिकाणी आळा घालणे शक्य आहे. परंतु झोपडपटटी भागात आळा घालणे कठीण असल्याने पालिकेने येथील नागरीकांना आधीच खरबदारीच्या सुचना दिल्या आहेत.त्यानुसार आता या ३९ हॉटस्पॉटमध्ये कळवा प्रभाग समितीमधील काही भाग, वागळे, लोकमान्य सावरकर नगर, नौपाडा, उथळसर, माजिवडा- मानपाडा, वर्तकनगर प्रभाग समिती आदी ठिकाणांच्या भागांचा समावेश आहे. या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आजही वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे या ३९ हॉटस्पॉटमधील गणेशभक्तांनी गणरायाचे घरच्या घरीच विसर्जन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे. याची अंमलबाजवणी करण्यासाठी संबधींत विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सुचना देण्यात आल्या आहेत.हॉटस्पॉटची ठिकाणेकळवा प्रभाग समिती अंतर्गत ०९, वागळे इस्टेट ०३, नौपाडा कोपरी ०७, माजिवडा मानपाडा ०४, उथळसर -०६, वर्तकनगर ०७, लोकमान्य सावरकर नगर ०३
शहरातील ३९ हॉटस्पॉटमधील गणेशभक्तांना घरीच करावे लागणार बाप्पाचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 2:46 PM