मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतल्याने गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना लोकलच्या ब्लॉकला सामोरे जावे लागले. मुंबईकरांचा गणेशोत्सव मोठा उत्सव असल्याने, या दिवशी ब्लॉक घेणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक घेऊनसुद्धा लोकलसेवा रखडत असते. रविवारी मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा दरम्यान सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला होता. यासह मध्य रेल्वे मार्गावरील सुमारे ३०० फेऱ्या कमी चालविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये गर्दीला सामोरे जावे लागले.मुंबईकर मोठ्या उत्साहात साजरा करणारा सण म्हणजे गणेशोत्सव. या सणात रेल्वे प्रशासन ब्लॉक घेऊन गणेशभक्तांना वेठीस धरत आहे. यात भांडुप-कांजुरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाला तडे जाण्याच्या घटनेमुळे रेल्वे मार्गावर आणखी ताण आला. त्यामुळे जादा गर्दीला सामोरे जावे लागले. रेल्वे प्रशासनाने सण-उत्सवाच्या काळात ब्लॉक घेऊ नये. रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे.- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद.कांजूरमार्ग-भांडुप दरम्यान रेल्वे रुळाला तडेठाण्याच्या दिशेने जाणाºया लोकल खोळंबल्यामध्य रेल्वे मार्गावरील कांजूरमार्ग-भांडुप या दरम्यान ठाणे दिशेकडे जाणाºया रेल्वे रुळाला रविवारी सकाळी मोठा तडा पडला. त्यामुळे ठाण्याच्या दिशेकडे जाणाºया लोकल खोळंबल्या होत्या. रविवारी मेगाब्लॉक असल्याने लोकल फेºया कमी चालविण्यात येत होत्या. यासह लोकल खोळंबल्याची घटना घडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे १०.०४ वाजेपर्यंत रेल्वे मार्ग दुरुस्त करण्यात आला.भांडुप-कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला होता. हे रेल्वेच्या जमिनीवर भाजी उगविणाºयाच्या गणेश चौहान यांच्या लक्षात आले. या वेळी या मार्गावरून रेल्वे येत होती. त्यांनी आपल्या हातातील छत्रीचा वापर करून मोटरमनला रेल्वे थांबविण्याचा इशारा दिला. ठाणे लोकलचे मोटरमन डी. एल. पवार आणि गार्ड पी.डी. चावडा यांनी लोकल मागेच थांबविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.