पीओपीची गणेशमूर्ती सार्वजनिक मंडपात नको; सर्व महापालिकांना आदेश द्या : हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 06:04 AM2024-08-31T06:04:04+5:302024-08-31T06:04:27+5:30

अशा मूर्ती बनवण्यावर जरब बसावी यासाठी दंडात्मक कारवाईसारखा धोरणात्मक निर्णय घेण्याचा निर्देश मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

Ganesha idol of POP should not be in public mandap High Court Order to all Municipal Corporations | पीओपीची गणेशमूर्ती सार्वजनिक मंडपात नको; सर्व महापालिकांना आदेश द्या : हायकोर्ट

पीओपीची गणेशमूर्ती सार्वजनिक मंडपात नको; सर्व महापालिकांना आदेश द्या : हायकोर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना द्या.  ज्यांना मंडपाची परवानगी दिली आहे, त्यांना पीओपी मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याची अट असल्याचे कळवा आणि ज्यांना अद्याप परवानगी दिली नाही, त्यांना तशी पूर्व अट घाला, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी सर्व महापालिकांना दिले.

घरगुती मूर्तींबाबत आदेश देण्यास नकार
- घरगुती पीओपीच्या मूर्तींबाबत काहीही आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्याशिवाय मूर्तिकारांनाही पीओपीच्या मूर्ती विक्रीस मनाई करण्याचे आदेश देण्यास तूर्तास नकार दिला.
- परंतु, अशा मूर्ती बनवण्यावर जरब बसावी यासाठी दंडात्मक कारवाईसारखा धोरणात्मक निर्णय घेण्याचा निर्देश मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार
- पीओपीच्या मूर्तींबाबत नागपूर खंडपीठाने स्वयंप्रेरणेने दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवरील आदेश न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
- त्यानंतर न्यायालयाने या याचिकेवर राज्य सरकार, महापालिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. 

Web Title: Ganesha idol of POP should not be in public mandap High Court Order to all Municipal Corporations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.