Join us  

गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 5:13 AM

या ‘महामहोत्सावा’चा समारोप सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिस, महापालिकांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत. विशेष म्हणजे यंदा डीजेबंदीसह लेझरबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे यंत्रणेपुढे आव्हान आहे.

मुंबई : दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज, मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे.

 या ‘महामहोत्सावा’चा समारोप सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिस, महापालिकांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत. विशेष म्हणजे यंदा डीजेबंदीसह लेझरबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे यंत्रणेपुढे आव्हान आहे.

 मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव बांधून दिले आहेत. तसेच पारंपरिक नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही महापालिका आणि मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली आहे.

हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने

  गणपतीची आरती करताना साेमवारी सायंकाळी  मंडळांच्या मंडपांतून ‘गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला’ अशा घाेषणा ऐकू येत हाेत्या.

मुंबई पोलिसांचा ‘ग्रीन कॉरिडॉर’

विसर्जनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. विसर्जन सोहळ्यासाठी अडीच हजार वाहतूक पोलिस महत्त्वाच्या मार्गांवर तैनात आहेत. ईस्ट-वेस्टची कनेक्टिव्हिटी सुरू राहावी, वाहतुकीत  बाधा येऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी नवी मुंबई ते मुंबई विमानतळ असा ग्रीन कॉरिडॉर तयार केला आहे.

नवी मुंबईत चोख व्यवस्था

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २४४ सार्वजनिक गणपतींसह आठ हजारांहून घरगुती गणपतींचे १३७ कृत्रिम आणि २२ नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह २२०० अंमलदारांबरोबरच शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या, १६ स्ट्रायकिंग आणि दंगल निवारण पथकाच्या दोन तुकड्याही तैनात आहेत.

ठाण्यात ४५ हजार मूर्तींचे विसर्जन होणार

 ठाणे जिल्ह्यात ४५ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यामध्ये ठाणे शहरात सार्वजनिक आणि घरगुती अशा साडेनऊ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल.

 कल्याण, डोंबिवली या शहरांत १६८ सार्वजनिक, तर १४,३३० घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे.

पालघरमध्ये तयारी

जिल्ह्यात ९२० सार्वजनिक, तर ५,९६० घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज आहे.  वसई-विरारमध्ये १०५ कृत्रिम तलाव, तर १४९ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था केली आहे.आहे.

रायगडात मोठा बंदोबस्त

रायगड जिल्ह्यात १७ हजार ३५९ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून, यापूर्वी मुरुडमधील विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :गणेशोत्सव 2024