Join us

गणपतीची वर्गणी न दिल्याने कार्यकर्ते अंगावर, व्यावसायिकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 1:40 PM

Ganesh Mahotsasav: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वर्गणी देण्यास नकार देणाऱ्या व्यावसायिकाला मारण्यासाठी तीन कार्यकर्ते अंगावर धावून आले. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी प्रदीप पांडे, कृष्णा गुप्ता आणि अब्बास शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वर्गणी देण्यास नकार देणाऱ्या व्यावसायिकाला मारण्यासाठी तीन कार्यकर्ते अंगावर धावून आले. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी प्रदीप पांडे, कृष्णा गुप्ता आणि अब्बास शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार  अन्साउल्ला चौधरी (५४) हे प्लॅस्टिक स्क्रॅपचा व्यवसाय करत असून, ते ४ सप्टेंबर रोजी साडेनऊच्या सुमारास कामानिमित्त साकीनाका पोलिस ठाण्यात आले होते. काम आटोपल्यानंतर ते तेथून बाहेर पडले आणि  कारमधून जाताना त्यांना पांडे व गुप्ता भेटले. त्या दोघांनी चौधरींना स्थानिक गणेशोत्सव मंडळाची पावती फाडायला सांगितली. वर्गणीसाठी चौधरींनी त्यांना कार्यालयात बोलावले. त्या दोघांनी ५ हजार रुपयांची पावती फाडली.

नेमके काय झाले? ९ सप्टेंबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास चौधरी हे मित्र मुस्ताक शेख (४५) याच्यासोबत साकीनाक्यातील एका हॉटेलमध्ये फालुदा खायला गेले. त्या ठिकाणी पांडे, गुप्ता, शेख हे अन्य एकासोबत आले. त्यांनी पुन्हा चौधरींकडे वर्गणी मागितली. त्यावेळीही एवढी मोठी वर्गणीची रक्कम देण्यास चौधरींनी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या त्या तिघांनी त्यांना शिवीगाळ करत मारण्यासाठी अंगावर धावून आले, असे चौधरींनी तक्रारी नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईगणेशोत्सव