मुंबई : कोरोनाच्या सावटात मंगळवारी राज्यभरात बाप्पांना निरोप दिला जाईल. महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेले आवाहन आणि प्रशासनासोबतच अनेक संस्थांनी घरच्या घरी विसर्जन,फिरते हौद, मूर्ती दान आदी मोहिमा प्रभावीपणे राबविल्याने यंदा अनेक शहरांमध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन पर्यावरणपूरक होण्याची चिन्हे आहेत. दीड दिवसाच्या, पाच दिवसांच्या विसर्जनावेळी अनेक शहरांमध्ये हेच चित्र होते.मुंबई : यंदा ६० टक्के मुंबईकरांनी श्रींची प्रतिष्ठापना केली. या पैकी १५ टक्के मूर्ती या मातीच्या होत्या, तर उर्वरित पीओपीच्या होत्या, अशी माहिती मुंबईकर मूर्तिकार राहुल घोणे यांनी दिली. यंदा बृहन्मुंबई महानगरपालिकेने १६८ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.पुणे : शहरात साधारणत: पाच लाख घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होते. यंदा दीड दिवसाच्या गणपतींसह पाचव्या दिवशी, गौरी गणपती व सातव्या दिवसापर्यंत शहरात मूर्ती संकलन केंद्र व फिरत्या हौदात एकूण ३६ हजार ४५३ गणेशमूर्ती जमा झाल्या.नागपूर : यंदा येथे ७० टक्के मूर्ती पीओपीच्या आहेत. शहरात मनपातर्फे २५० कृत्रिम हौदांची व्यवस्था केली आहे. १० झोनमध्ये १० फिरते विसर्जन रथ लावलेआहेत.औरंगाबाद : यंदा इथे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या २.२५ लाख मूर्र्तींची प्रतिष्ठापना केली असून, विसर्जनासाठी २३ ठिकाणी मूर्तींचे संकलन केले जाईल. ११ विहिरींत विसर्जन होईल.सोलापूर : महापालिकेने आठ झोनमध्ये शाळा, मंदिर, मैदान, आदी ठिकाणी विसर्जनाची सोय केली आहे.नाशिक : शहरात यंदा केवळ ११५ मोठे आणि १६४ लहान मंडळांसह ७० ते ७५ हजार घरगुती श्री गणेशाची स्थापना केली. विसर्जनासाठी यंदा नाशकात साडेनऊ टन ‘अमोनियम बायकाबोर्नेट’ वितरित केले. शहरात कृत्रिम आणि नैसर्गिक ठिकाणे मिळून ३३ जागांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.कोल्हापूर : शहरात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या सुमारे चार लाख तर शाडूच्या सुमारे ५0 हजार गणेश मूर्तींची विक्री झाली. सार्वजनिक ५८६१, तर २,३१,५४४ घरगुती मूर्तींचे दान करण्यात आले. शहरात २१० ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.जळगाव : शहरात एक लाख ५६ हजार प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्तींची विक्री झाली. विसर्जनासाठी २६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे तयार केली आहेत. काही विहिरीत तर काही मूर्ती कृत्रिम हौदात विसर्जित केल्या जातील.संकलन : सचिन लुंगसे (मुंबई), श्रीकिशन काळे (पुणे), निशांत वानखेडे (नागपूर), शीतलकुमार कांबळे (सोलापूर), अझहर शेख (नाशिक), ऋचिका पालोदकर (औरंगाबाद), संदीप आडनाईक (कोल्हापूर), अजय पाटील (जळगाव).
गणेशोत्सव : यंदा होणार बाप्पांचे पर्यावरणपूरक विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 7:15 AM