मुंबई : गणेशोत्सवाला अवघा आठवडा उरला असताना अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. स्थानिक पोलीस तसेच वाहतूक पोलिसांकडून हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतीक्षेत बहुतेक जण आहेत. निम्म्याहून अधिक मंडळांनी गणेशमूर्ती मंडपात आणण्यास सुरुवात केली असताना ५८० मंडळे अद्याप परवानगीच्या रांगेत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया जलद करून तत्काळ परवानगी मिळवून देण्याचे साकडे मंडळांनी घातले आहे.पुढच्या आठवड्यात २५ आॅगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. यासाठी मंडळांची लगबग सुरू असून संपूर्ण मुंबापुरी सज्ज झाली आहे. बºयाच मंडळांनी सजावटीपूर्वी गणेशमूर्ती मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून आणून मंडपात आणली आहे. त्याच वेळी अनेक मंडळे अद्यापही पालिका व पोलिसांकडून परवानगी मिळण्याची वाट पाहत आहेत.मुंबईत सुमारे दहा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी या मंडळांच्या संख्येत वाढ होत असते. या वर्षी १४ आॅगस्टपर्यंत ७३८ मंडळांनी मंडप उभारण्याची परवानगी पालिकेकडे मागितली आहे. मात्र यापैकी ६० अर्ज फेटाळण्यात आले असून ५८० मंडळांचे अर्ज विविध परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.या मंडळांना दिलासा देण्यासाठी समन्वय समितीने ही परवानगीप्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची विनंती पालिका व पोलिसांना केली आहे.>यांच्या परवानगीच्या प्रतीक्षासार्वजनिक मंडळांनी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, महापालिका आणि अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच या मंडळांच्या मंडपांना परवानगी मिळते.>पालिकेचा दिलासा : मंडप उभारण्याची परवानगी५ आॅगस्टपर्यंतच देणाºया पालिकेच्या परिपत्रकामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे हवालदिल झाली होती. मात्र स्थायी समितीच्या आक्षेपानंतर पालिका प्रशासनाने माघार घेत मंडपांसाठी परवानगी देण्याचे आदेश संबंधित विभाग कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या मार्गातील विघ्न टळले आहे.>परवानगी जलद मिळावीतांत्रिक अडचणींमुळे या परवानग्या रखडल्या आहेत. पादचारी, वाहन आणि रुग्णवाहिकांना अडथळा होणार नाही, याची हमी घेऊन या मंडळांना परवानगी द्यावी, अशी विनंती संबंधित प्राधिकरणांना केली असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी नरेश दहिबावकर यांनी सांगितले.मंडपासाठी आलेले अर्ज - ७३८परवानगी मिळालेली मंडळे - १७अर्ज फेटाळले - ६०परवानगीच्या प्रतीक्षेत - ५८०
गणेशोत्सव मंडळे मंडप परवानगीच्या रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 2:13 AM