गणेशोत्सव : कोरोनामुळे नियमांचे पालन करा; मुंबई महापालिकेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 03:22 PM2020-07-26T15:22:20+5:302020-07-26T15:22:58+5:30

घरगुती श्रीगणेशोत्सव साजरा करणा-या भाविकांनी कोरोनामुळे नियमांचे पालन करावे

Ganeshotsav: Follow the rules because of Corona; Appeal of Mumbai Municipal Corporation | गणेशोत्सव : कोरोनामुळे नियमांचे पालन करा; मुंबई महापालिकेचे आवाहन

गणेशोत्सव : कोरोनामुळे नियमांचे पालन करा; मुंबई महापालिकेचे आवाहन

Next

मुंबई : घरगुती श्रीगणेशोत्सव साजरा करणा-या भाविकांनी कोरोनामुळे नियमांचे पालन करावे, असे म्हणत मुंबई महापालीकेने घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी. या मूर्तीची उंची दोन फूटापेक्षा जास्त असू नये. किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू, संगमरवर मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे कुटुंबियांचे कोरोनापासून संरक्षण करणे शक्य होईल, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे.

घरगुती गणेशमूर्ती आगमनासाठी जास्तीत-जास्त ५ व्यक्तिंचा समूह असावा. आगमनप्रसंगी मास्क, शिल्ड, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या स्वसंरक्षणाची साधने काटेकोरपणे वापरण्यात यावीत. दर्शनास येणा-या व्यक्तिंना मास्क परिधान करण्याचा आग्रह धरावा. सॅनिटायझरची व्यवस्था करावी. या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळीदेखील करता येणे शक्य आहे.त्यासाठी मूर्तीचे पावित्र्य राखणेसाठी पवित्र वस्त्रात गुंडाळून घरीच मूर्ती जतन करुन ठेवता येईल. विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे. विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये.

दरम्यान, राज्य सरकारने गणेशोत्सवासंबंधी काढलेल्या एका पत्रकात मातीची गणेशमूर्ती वर्षभर घरात ठेवून तिचे पुढच्यावर्षी विसर्जन करा, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात हे योग्य नाही. कारण मातीची गणेशमूर्ती वर्षभर घरात ठेवली तर वातावरणातील तापमानात होणा-या बदलामुळे मूर्तीस तडा जाऊ शकतो. लहान मूर्ती आणून घरातच योग्य दिवशी बादलीतील स्वच्छ पाण्यात विसर्जन करावी. हे योग्य होईल. मात्र मातीची मूर्ती वर्षभर घरात ठेवा, असे सांगणे योग्य नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी म्हटले आहे.

Web Title: Ganeshotsav: Follow the rules because of Corona; Appeal of Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.