अंधेरीच्या राजाचा गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 06:51 PM2020-08-20T18:51:29+5:302020-08-20T18:52:19+5:30

गणेशोत्सवर कोरोनाचे सावट आहे.

Ganeshotsav of King of Andheri will be celebrated with simplicity | अंधेरीच्या राजाचा गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा

अंधेरीच्या राजाचा गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवर कोरोनाचे सावट आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतांना गणेश मूर्ती 4 फूटांपर्यंत ठेवा असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व गणेश भक्तांना केले आहे.

दरवर्षी संकष्टीला विसर्जन होणारा गणपती अशी अंधेरीच्या राजाची ख्याती आहे. दरवर्षी लाखो भक्त अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट लक्षात घेता आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आझाद नगर उत्सव समितीने यंदा अंधेरीच्या राजाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती या समितीचे प्रमुख मार्गदर्शक व पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे यांनी लोकमतला दिली. पालिकेच्या व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 दरवर्षी अंधेरीच्या राजाची मूर्ती सुमारे 8 फूट असते मात्र मात्र यंदा येथील मूर्ती चार फूटांची आहे. नागरिकांनी दर्शनाला गर्दी करू नये आणि सर्वांना लांबून अंधेरीच्या राजाचे खुल्या मंडपातून दर्शन मिळण्यासाठी खास हायड्रालिक लिफ्टवर अंधेरीच्या राजाची मूर्ती विराजमान असेल आणि नागरिकांना लांबून देखिल सुलभ दर्शन मिळेल. यंदा स्वर्गाचा देखावा साकार केला आहे. विशेष म्हणजे  येथील गणेशोत्सवा बरोबरच आरोग्यत्सव समिती साजरा करणार असून सलग 14 दिवस रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे. तसेच अंधेरीच्या राजाचे लाईव्ह दर्शन हे केबल वरून मिळणार असून  गणेश भक्तांना झूमच्या माध्यमातून रोजच्या आरतीचा लाभ घेता येईल अशी माहिती फणसे यांनी दिली.

अंधेरीच्या राजाचे यंदा कृत्रिम तलावात होणार विसर्जन : दरवर्षी अंधेरीच्या राजाची हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत वाजत गाजत भव्य विसर्जन मिरवणूक संकष्टीला सायंकाळी 6 वाजता अंधेरीच्या राजाच्या मंडपातून निघते. 18 तासांच्या मिरवणुकीत नंतर दुसऱ्या दिवशी वेसावे समुद्रात अंधेरीच्या राजाचे विसर्जन होते. मात्र यंदा कोरोनामुळे अंधेरीच्या राजाची  विसर्जन मिरवणूक निघणार नसून  मंडपाच्या जवळ उभारलेल्या कृत्रिम तलावातच संकष्टीला अंधेरीच्या राजाचे विसर्जन होणार आहे. तसेच येथील नागरिकांच्या सुविधेसाठी त्यांच्या घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन देखिल येथील कृत्रिम तलावातच करण्यात येणार असल्याची माहिती फणसे यांनी शेवटी दिली.
 

Web Title: Ganeshotsav of King of Andheri will be celebrated with simplicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.