Join us

गणेशोत्सव मंडळे देणार प्लॅस्टिकबंदीचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 5:42 AM

पालिकेचा उपक्रम : सहकार्याचे आवाहन

मुंबई : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने कारवाई सुरू केली. मात्र दोन महिन्यांनंतर पुन्हा बाजारात प्लॅस्टिकचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून महापालिका आता मुंबईकरांमध्ये जनजागृती करणार आहे. प्लॅस्टिकचे दुष्परिणाम देखाव्यातून भाविकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मंडळांना करण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार २३ जूनपासून मुंबईत प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आली आहे. या नियमाचे पालन न करणाºया नागरिकांना पाच हजार ते २५ हजार रुपये दंड करण्यात येऊ लागला. त्यामुळे मंडई, रेल्वे स्थानक, दुकानातून प्लॅस्टिक पिशव्या गायब झाल्या. मात्र या कारवाईला सुरुवात होऊन दोन महिने उलटल्यानंतर आता प्लॅस्टिकचा वापर पुन्हा काही ठिकाणी होऊ लागल्याने महापालिकेची मोहीम फेल होऊ लागली आहे. गणेशोत्सवात प्रत्येक मंडळांच्या माध्यमातून भक्तांना प्लॅस्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहनच केले जाणार आहे. त्यानुसार भक्तांना प्लॅस्टिक पिशव्यांचे दुष्परिणाम दृक्श्राव्य माध्यमातून पटवून देण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेकडून मुंबईतील अनेक मोठ्या मंडळांना पत्र पाठवून प्लॅस्टिक पिशव्यांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.अशी करणार जनजागृतीगणेशोत्सव मंडळांना सीडीचे वाटप करण्यात येणार आहे. या सीडीमध्ये प्लॅस्टिकचे दुष्परिणाम याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर फलक, घोषवाक्य, व्हिडीओद्वारेही जनजागृती व प्लॅस्टिकला पर्यायी वस्तू सुचविण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :गणेशोत्सवप्लॅस्टिक बंदी