Join us

गणेशोत्सव : खरेदीसाठी मुक्त इंटरनेटला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:07 AM

मुंबई : जागतिक महासंकटातील कठीण अशा वर्षभराच्या काळानंतर ग्राहक हे गणेश उत्सव आणि दिवाळी, दसरा तसेच ख्रिसमस अशा आगामी ...

मुंबई : जागतिक महासंकटातील कठीण अशा वर्षभराच्या काळानंतर ग्राहक हे गणेश उत्सव आणि दिवाळी, दसरा तसेच ख्रिसमस अशा आगामी सणांच्या खरेदीसाठी सज्ज झाले आहेत. एका सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, ९१ टक्के नागरिक आगामी सण - उत्सवांसाठी खरेदी करण्याच्या योजना आखत आहेत. दर १० पैकी सहा ग्राहक सणासुदीच्या काळातील सेलबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

दर पाचपैकी सुमारे तीन ग्राहक आगामी फेस्टिव्ह सीझन सेलसाठी उत्सुक आहेत तर दर १० पैकी ९ जण या काळात खरेदी करण्याची योजना आखत आहेत. सर्वेक्षणानुसार, ८२ टक्के प्रतिसादकर्त्यांनी मागील सहा महिन्यांत महिन्याला किमान एकदा ऑनलाइन शॉपिंग केली आहे. दर चारपैकी एका ग्राहकाने बऱ्याचदा किंवा आठवड्यातून अनेकदा ऑनलाइन शॉपिंग केले आहे.

या संशोधनानुसार, ५३ टक्के लोक त्यांनी खरेदी केलेल्या गोष्टीच्या बाबतीत तटस्थ किंवा उदासीन असतात. त्याचप्रमाणे दर १० पैकी ६ टक्के लोकांना सणासुदीच्या काळात नव्या गोष्टीविषयी जाणून घेण्यात रस असतो. महिला यात पुरुषांच्या तुलनेत आघाडीवर आहेत. फेस्टिव्ह सीझन सेल्समध्ये महिला जाहिरातींकडे अधिक लक्ष देतात.

--------------------

मुक्त इंटरनेटवरील माध्यमे (३४ टक्के)

- व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म (ओटीटी)

- म्युझिक स्ट्रीमिंग सेवा

- वेबसाईट्स

- मोबाइल ॲप्स

--------------------

- सोशल मीडियाचा वाटा ३३ टक्के

- पारंपरिक ऑफलाइन माध्यमांचा (थेट मेल, पारंपरिक टीव्ही जाहिराती, आउटडोअर जाहिरात आणि मौखिक लोकप्रियता) वाटा ३२ टक्के

--------------------