गणेशोत्सव विशेष गाड्या तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:02+5:302021-07-11T04:06:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोकण रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू होताच काही वेळातच वेटिंग सुरू झाले. ...

Ganeshotsav special trains | गणेशोत्सव विशेष गाड्या तुडुंब

गणेशोत्सव विशेष गाड्या तुडुंब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोकण रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू होताच काही वेळातच वेटिंग सुरू झाले. एका दिवसात प्रतीक्षा यादी ३००च्याही पुढे गेली आहे. गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली असून ५ सप्टेंबरपासून त्या धावणार आहेत. यासाठीच्या आरक्षणाला ८ जुलैपासून सुरुवात झाली आहे.

‘सीएसएमटी ते सावंतवाडी’ ५ सप्टेंबरपासून रोज धावणाऱ्या या गाडीच्या शयनयान श्रेणीला (स्लीपर क्लास) ५ सप्टेंबरला ८१, ७ सप्टेंबरला ३६३ आणि ९ सप्टेंबरला ३९९ अशी प्रतीक्षा यादी आहे. आसन श्रेणीसाठी ७ सप्टेंबरला २६० प्रतीक्षा यादी असून ८ आणि ९ सप्टेंबरला तिकीटच उपलब्ध नाही. ‘पनवेल ते सावंतवाडी’ आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. ७ सप्टेंबरपासून धावणाऱ्या या गाडीची आसन श्रेणीतील प्रतीक्षा यादी १८६ आणि ८ सप्टेंबरच्या गाडीची प्रतीक्षा यादी ३००च्या वर गेली आहे.

Web Title: Ganeshotsav special trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.