मुंबई : श्रीगणेश ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा होती. आपल्या अंतर्मनात असलेले दोष दूर करण्यासाठी गणेशाचे पूजन आवश्यक आहे. असे सावरकर सांगायचे.गणेशाकडून प्रेरणा घेतच आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याचा लढा दिला. त्यामुळे आपणदेखील श्रीगणेशाकडून लढण्याची प्रेरणा घ्यायला हवी, असे मत लेखिका आणि अनुवादक अरुंधती दीक्षित यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शनिवारी गणेशोत्सवानिमित्त ‘गणेश - एक संकल्पना’ या विषयावर आॅनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या.गणांचा अधिपती असलेला गणपती ही समूहाचे नेतृत्व करणारी देवता आहे. ‘गण’ याचा अर्थ अष्टवसुंचा समूह. ‘वसु’ म्हणजे दिशा. गणपती हा सर्व दिशांचा पती आहे. म्हणूनच कोणत्याही देवदेवतांच्या पूजेच्या आधी व मंगलकार्याच्या प्रारंभी गणपतीचे पूजन केले जाते.गणपती हा अलौकिक, भव्यदिव्य आणि एकमेवाद्वितीय आहे. तो आद्यदेव, मंगलमूर्ती, विघ्नविनाशक, विद्यादाता, विविध कलांचा अधिपती, उत्तम पुत्र, योद्धा, लेखनिक, विचारवंत, मुत्सद्दी, स्त्रीसंघटक असे अनेक गुण त्याच्या ठायी एकवटले आहेत. म्हणूनच त्याला ‘गुणेश’ असंही संबोधतात.गणपती हा शंकराचा पुत्र असला तरीदेखील त्याचे मूर्तीविज्ञान उत्पत्ती व इतर बाबी शंकराशी साधर्म्य दर्शवितात, यामुळे शंकर हा गणपती या नावाने नवीन देवतेच्या स्वरूपात आला असावा असे दर्शविते.गणांचा अधिपती असलेला गणपती ही समूहाचे नेतृत्व करणारी देवता आहे. ‘गण’ याचा अर्थ अष्टवसुंचा समूह. ‘वसु’ म्हणजे दिशा. गणपती हा सर्व दिशांचा पती आहे़ पूजेच्या आधी व मंगलकार्याच्या प्रारंभी गणपतीचे पूजन केले जाते.
गणेशोत्सव : श्रीगणेशाकडून आपण लढण्याची प्रेरणा घ्यायला हवी - अरुंधती दीक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 3:02 AM