बांगलादेशी नागरिकांना बनावट पासपोर्ट देणाऱ्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 04:47 AM2020-12-15T04:47:56+5:302020-12-15T06:55:44+5:30

सात वर्षांत भारतात ८५ जणांनी केली घुसखोरी

Gang arrested for giving fake passports to Bangladeshi nationals | बांगलादेशी नागरिकांना बनावट पासपोर्ट देणाऱ्या टोळीला अटक

बांगलादेशी नागरिकांना बनावट पासपोर्ट देणाऱ्या टोळीला अटक

Next

मुंबई : बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट (पारपत्र) मिळवून देणाऱ्या रॅकेटचा राज्य दहशतवादविरोधी पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणी ४ बांगलादेशी नागरिकांसह त्यांना मदत करणाऱ्या एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने ७ वर्षांत ८५ बांगलादेशी नागरिकांना बनावट पासपोर्ट तयार करून दिल्याचे समोर आले आहे.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंंबर रोजी शिवडीतून अक्रम नूर नबी ओलाउद्दीन शेख (२८) या बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली. तो घुसखोरीच्या मार्गाने भारतात आला. येथे त्याच्या वास्तव्यासाठी वडाळ्यातील नूर नवी आणि मुंब्रा येथील रफिक शेख यांच्यामार्फत आधारकार्ड, पॅनकार्ड व भारतीय पासपोर्ट मिळाले. त्यानुसार शेख व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत तपास सुरू केला.
तपासादरम्यान रफिक रहमतुल्ला सय्यद (४२) याला मुंब्रा येथून अटक करण्यात आली. तो २०१३ पासून पासपोर्ट दलाल म्हणून काम करतो. त्याने आतापर्यंत ४४६ लोकांचे पासपोर्ट काढून दिले आहेत. यामध्ये ८५ बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.

भारतात घुसखोरीच्या मार्गाने आलेला बनावट भारतीय ओळखपत्र, पासपोर्ट बाळगणारा अक्रम याच्यासोबत मोहम्मद सोहेल अब्दुल सुभान शेख (३३), अब्दुलखैर समसुलहक शेख (४२), अबुल हाशम ऊर्फ अब्दुल काशम शेख (२६) अशा ४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्यांना मदत करणारे इद्रिस मोहम्मद शेख, नितीन निकम आणि अविन केदारे यांनाही अटक करण्यात आली.

मोबाइल, सिमकार्ड जप्त
अटक करण्यात आलेल्या अक्रमकडे ३ मोबाइल, ७ बांगलादेशी सिमकार्ड, १८ भारतीय सिमकार्ड व विविध बँकांचे ८ एटीएम कार्ड तसेच कागदपत्रांसह ८ लाख ३० हजार ७३० रुपये सापडले. तर रफिक शेखकडे वेगवेगळ्या तीन पॅनकार्डसह वाहन चालक परवाना, डेबिट कार्ड, दोन मोबाइल फोन आणि ४४६ पासपोर्टधारकांचे अर्ज आणि अर्ज नोंदणी डायरी जप्त करण्यात केली.                   

Web Title: Gang arrested for giving fake passports to Bangladeshi nationals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.