लोकलवर फटका गँगचे हल्ले, उपाययोजना कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:34 AM2019-09-28T01:34:03+5:302019-09-28T01:34:11+5:30

दगडफेक आणि फटका गँगच्या हल्ल्यांपासून प्रवाशांची सुटका कधी होणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला आहे.

Gang attacks on local, when to remedy? | लोकलवर फटका गँगचे हल्ले, उपाययोजना कधी?

लोकलवर फटका गँगचे हल्ले, उपाययोजना कधी?

Next

मुंबई : नुकतेच मध्य रेल्वे मार्गावरील कोपर ते डोंबिवली यादरम्यान दोन वेळा आणि हार्बर मार्गावरील रे रोड ते डॉकयार्ड यादरम्यान एकदा फटका गँगचा फटका प्रवाशांना बसला. तीन प्रवासी जखमी झाले. दगडफेक आणि फटका गँगच्या हल्ल्यांपासून प्रवाशांची सुटका कधी होणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला आहे.

फटका गँग आणि लोकलवर होणारी दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोटरमनच्या केबिनवर सीसीटीव्ही लावून चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

फटका गँग आणि लोकलवर दगडफेक करणाऱ्यांपैकी मानसिक रुग्ण असतात. तर काही नशेच्या आहारी गेलेले असतात. या घटनांवर आळा बसविण्यासाठी मोटरमन केबिनबाहेर सीसीटीव्ही लावण्यात येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे रूळ आणि रेल्वे परिसरात होणाºया प्रत्येक घटनेचे दृश्य टिपता येणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून रेल्वे परिसरात गस्ती घालण्यात येते, अशी प्रतिक्रिया रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाºयांनी दिली.

Web Title: Gang attacks on local, when to remedy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.