तात्काळ तिकिटासाठी प्रवाशांना गंडा घालणारी टोळी गजाआड
By admin | Published: October 5, 2014 02:03 AM2014-10-05T02:03:12+5:302014-10-05T02:03:12+5:30
राज्याबाहेर जाणा:या प्रवाशांना तिकिटांच्या माध्यमातून गंडा घालणा:या 5 जणांच्या टोळीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली.
Next
>मुंबई : राज्याबाहेर जाणा:या प्रवाशांना तिकिटांच्या माध्यमातून गंडा घालणा:या 5 जणांच्या टोळीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. यात काही रेल्वे कर्मचा:यांचा समावेश असून, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून लोकमान्य टिळक टमिर्ंनसवर ही टोळी कार्यरत होती. इतर राज्यांत जाण्यासाठी एखाद्या प्रवाशाला तात्काळ तिकीट हवे असल्यास ते लगेच मिळत नाही. या तिकिटांसाठी आधी बुकिंग करावे लागते. मात्र ही टोळी कैक पटीने जास्त पैसे आकारून प्रवाशांना तात्काळ तिकीट उपलब्ध करून देत असे. तिकिटांच्या दरापेक्षा प्रवाशांकडून कधी दुप्पट तर कधी चौपट पैसे आकारून ही टोळी लूट करीत असे. मात्र प्रवाशांना ज्या ठिकाणी जायचे आहे ते तिकीट न देता, काही स्थानक अगोदरचे तिकिटे ही टोळी देत असे. त्यामुळे अनेक प्रवाशांना टीसींनी दंड ठोठावल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात गेल्या महिन्याभरात तीन प्रवाशांनी तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर पोलिसांनीच प्रवासी बनून लोकमान्य टर्मिनसवर तिकिटासाठी रांगा लावल्या. याच दरम्यान या टोळीतील देवेंद्र पाटील (31) आणि बदरू शेख (34) हे दोघे जण या ठिकाणी आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अब्रेस रंजन (2क्), सूरजकुमार यादव आणि मंगळदेव शर्मा (34) या तिघांची देखील नावे सांगितली. त्यानुसार तिघांनाही अटक केली. (प्रतिनिधी)